शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय ?

By admin | Updated: September 18, 2015 00:22 IST

अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दहा दिवसांनंतर तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

१० दिवसांनंतर ‘त्याची’ सुटका : पालकांची पोलिसांत तक्रारअमरावती : अल्पवयीन मुलांना तृतीयपंथी जाळ्यात अडकविणारी टोळी सक्रिय झाली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला दहा दिवसांनंतर तृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. तृतीयपंथीयांच्या समूह विस्ताराच्या अनुषंगाने हा प्रकार सुरु असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.जिल्ह्याती एका गावातील रहिवासी असलेला १७ वर्षीय मुलगा अमरावतीत शिक्षणासाठी आला आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत हा मुलगा भाड्याच्या खोलीत राहतोे. ८ सप्टेंबर रोजी येथील जयस्तंभ चौकात खासगी शिकवणीसाठी आलेला हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. या घटनेची माहिती त्याच्या पालकाला ९ सप्टेंबर रोजी मिळाली. ते या घटनेने चक्रावून गेले. बेपत्ता झालेल्या मुलाचा त्यांनी मित्र, नातवाईकांकडे कसून शोध घेतला. मात्र, त्याचा कोठेही थांगपत्ता लागू शकला नाही. अखेर त्यांनी मुलगा हरविल्याची तक्रार शहर कोतवाली पोलिसात नोंदविली. त्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी त्यादिशेने तपासाची चक्रे फिरवली असता बेपत्ता मुलासोबत संपर्क ठेवून असलेल्यांचा शोध घेण्यात आला. त्याच्या भ्रमणध्वनीवर येणारे कॉल तपासले असता या मुलासोबत तृतीयपंथीयांचा संपर्क आल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यावरून हा अल्पवयीन मुलगा नेमका कोणत्या तृतीयपंथींयांच्या टोळीत गेला असावा, याचा कयास लावून त्याअनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात तृतीयपंथीयांची चौकशी केली. मात्र, हा अल्पवयीन मुलगा आढळला नाही. तरीही हा मुलगा तृतीयपंथीयांच्या जाळ्यात अडकल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. दरम्यान मुलाच्या खोलीची तपासणी केली असता तृतीयपंथीय संघटनांशी संबंधित काही जणांचे कागदपत्रे पोलिसांना आढळले. त्यामुळे बेपत्ता मुलगा हा तृतीयपंथीयांच्या जाळ्यात फसला आहे, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले होते. त्यामुळे शहर कोतवाली पोलिसांनी बडनेरा रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने तृतीयपंथीयांच्या तावडीतून त्याला मुक्त करण्याची मोहीम सुरू केली. रेल्वे गाड्यात पैसे मागण्यासाठी तृतीयपंथीयांची टोळी चालविणाऱ्या प्रमुखाला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर आठवडाभरापासून बेपत्ता असलेला तो मुलगा गुरूवारी त्याच्या घरी सुखरूप पोहोचला. कदाचित पोलिसांच्या धाकाने तृतीयपंथीयांनी त्याची सुटका केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)‘त्या’ बेपत्ता मुलाची पोलिसात नोंदतृतीयपंथीयांच्या तावडीतून मुक्त करण्यात आलेल्या या मुलाची नोंद शहर कोतवाली पोलिसात करण्यात आली आहे. तसेच आई- वडिलांनी तक्रार दिल्याची नोंद असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. हा युवक तृतीयपंथीयांच्या जाळ्यात अडकला की, स्वत: त्या दिशेने गेला, याबाबत संभ्रम कायम आहे. परंतु तृतीयपंथी समूह हे संख्या वाढीसाठी मुलांना जाळ्यात अडकवितात, असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.बेपत्ता झालेला ‘तो’ अल्पवयीन मुलगा सुखरूप परतला आहे. पोलीस प्रशासनाने तृतीय पंथियांशी निगडित एका क्लबचे कार्ड सदर युवकाच्या खोलीत आढळल्याने त्या दिशेने तपास चालविला होता. यात पोलीस यशस्वी झाले. मात्र तो कोठे होता, कसा होता हे सांगण्यास या मुलाने नकार दिला आहे. - दिलीप पाटील,पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली.