शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजना राबविताना कुचराई केल्यास कारवाई

By admin | Updated: July 20, 2016 00:06 IST

पंतप्रधान पीक विमा योजना शेतकरी बांधवांसाठी उपयोगी असून प्रशासनाने लहान-सहान बांबींचा बागुलबुवा न करता सकारात्मकपणे योजना राबविणे आवश्यक आहे.

पालकमंत्री : शेतकऱ्यांना सहकार्य करा, अधिकाऱ्यांना तंबीअमरावती : पंतप्रधान पीक विमा योजना शेतकरी बांधवांसाठी उपयोगी असून प्रशासनाने लहान-सहान बांबींचा बागुलबुवा न करता सकारात्मकपणे योजना राबविणे आवश्यक आहे. यात कुचराई केल्यास मुलाहिजा न ठेवता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी मंगळवारी प्रशासनला बजावले. तलाठ्याकडून पेरेपत्रक साक्षांकित नसल्यामुळे पीक विमा काढताना त्रास होत असल्याच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे शेतकऱ्यांनी प्राप्त केल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली.पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये भात, ज्वारी, मका, तुर, मुग, उडीद, मुईमुग, तीळ, सोयाबिन, कापूस. इत्यादी पीकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय फायदेशिर आहे जोखमीच्या बाबी-योजनेअंतर्गत जोखमींची व्याप्ता वाढविण्यात आली असून त्यामध्ये पिक पेरणीपासून काढणीपर्यंच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणारी घट. हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावनी न झाल्यामुळे होणारे नुकसान. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. काढणी पश्चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीचा समावेश यामध्ये आहे .स्वखर्चाने वाटली२ लाख माहिती पत्रकेपंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशिर असुन व विमा काढण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै असल्यामुळे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्वखर्चाने या पीक विमा योजनेची संपूर्ण माहिती असलेले २ लाख माहिती पत्रकांचे वाटप स्वत:ची यंत्रणा वापरून केले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सामील व्हावे म्हणून पालकमंत्री आग्रही आहेत. पंतप्रधान पक विमा योजनेची पालकमंत्री दररोज प्रशासनाकडुन माहिती घेत आहे. पीक विमा काढताना कुचराई होत असल्यास ८३७८०८९००० या क्रमाकांवर व्हॉट्स अ‍ॅपवर तक्रार करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.