शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात वीजबिल थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात महावितरणच्या वीजबिलाच्या थकबाकीची स्थिती अत्यंत नाजूक असून जून महिन्यात उद्दिष्टांच्या केवळ ३४ टक्केच वसुली झाली. याशिवाय ...

अमरावती : जिल्ह्यात महावितरणच्या वीजबिलाच्या थकबाकीची स्थिती अत्यंत नाजूक असून जून महिन्यात उद्दिष्टांच्या केवळ ३४ टक्केच वसुली झाली. याशिवाय जुलै महिन्यात पहिल्या २२ दिवसांत ३७८ कोटींच्या उद्दिष्टांपैकी ७७ कोटीच वसूल झाले. येत्या आठवडाभरात किमान ८३.५४ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. अन्यथा कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे निर्देश नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी शुक्रवारी येथे दिले.

महावितरणची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, भविष्यात थकबाकीदार ग्राहकांना उधारित वीज देणे महावितरणला शक्य नसल्याने थकबाकीदार वीज ग्राहकांकडून शंभर टक्के थकबाकी वसुलीचे निर्देश रंगारी यांनी दिले. महावितरणच्या विद्युत भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, उपमहाव्यवस्थापक (वित्त वे लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, कार्यकारी अभियंता आनंद काटकर, भारतभूषण औगड, अनिरूध्द आलेगावकर, दीपक अघाव यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील ५ लाख ५० हजार वीज ग्राहकांकडून जुलै महिन्यात ३७८ कोटी वसुलीचे उद्दिष्टे देण्यात आली. त्यापैकी २२ दिवसात केवळ १६.४६ टक्केच वसुली झाली आहे. त्यामुळे पुढील ९ दिवसात ८३.५४ टक्के वसुलीचे टार्गेट पूर्ण करावे लागणार आहे. अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याचे प्रादेशिक संचालक म्हणाले. याचाच भाग म्हणून काही अभियंतांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना प्रादेशिक संचालकाकडून करण्यात आल्या आहे.