शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेच्या एकजुटीनेच मिळणार लढ्याला यश

By admin | Updated: June 9, 2016 00:18 IST

महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीने शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी राज्यभर संघटनेची बांधणी केली.

बी.टी. देशमुख यांचे मत : विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन अंतिम टप्प्यातअमरावती : महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीने शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी राज्यभर संघटनेची बांधणी केली. संघटना उभारून विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडले. मागील १५ वर्षे हा लढा निरंतरपणे सुरु ठेवला. आता कुठे हे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून हे संघटनेने एकजुटीने उभारलेल्या लढ्याचे यश होय, असे मत माजी आमदार बी.टी. देशमुख यांनी व्यक्त केले.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात अमरावती विभागातील विना अनुदानित शिक्षकांचे मागील आठवडभरापासून बेमुदत उपोषण सुरू आहे. बुधवारी त्यांनी या आंदोलनाला भेट दिली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघात १९९ देशांनी मनुष्याच्या विकासाची व्याख्या तयार केली आहे. मानवी विकास म्हणजे संधीची उपलब्धता होय. शिक्षण, आरोग्य व उपजिविकेचे साधन अशी क्रमवारी मानवी विकासासाठी लागू करण्यात आली आहे. मानवी विकासात शिक्षणाला अग्रक्रम दिला असताना शिक्षणक्षेत्रात कार्यरत शिक्षकांची परवड का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शासनकर्त्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाला प्राधान्य दिल्याने अन्य शिक्षण माघारले आहे. शासनाने मानवाची विक्री करण्याचा जणू धंदाच सुरु केलाय, असा आरोपही बीटींनी केला. शासनाच्या मते शिक्षक म्हणजे बिगार होय. त्यांना मोबदला कमी दिला काय अथवा दिलाच नाही, तर काहीही बिघडत नाही, असा कारभार सुरु आहे. ‘कायम’ या शब्दाबाबत शासनाने वेगळा अर्थ लावला आहे. कायम अनुदानित शाळा मंजूर करताना कधीही अनुदान देता येणार नाही, असा अर्थ लावण्यात आला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने हे सर्व मुद्दे खोडून काढले असून कधीही अनुदान देता येणार नाही, असा याचा अर्थ नाही, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. विधी मंडळात १० जून २००९ रोजी शासनकर्त्यांना ही बाब चांगल्या तऱ्हेने सांगितल्याचे बी. टी. देशमुख म्हणाले. १० जून २००९ रोजी शासनाने विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न आठवडाभरात सोडविण्याचे जाहीर केले होते. मात्र, ७ वर्षांचा कालावधी लोटला असताना अंमलबजावणी झालीच नाही, असेही बीटी म्हणाले. परंतु आता दोन दिवसांत प्रश्न सोडवू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र, शासनकर्त्यांजवळ जर वेळ नसेल तर ती वेळ जुळवून आणण्यासाठी संघटनेला पुढाकार घ्यावा लागेल. प्रश्न सुटेपर्यंत आंदोलनाला गती देण्यासाठी एकजुटीने ताकद दाखवावी लागेल. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने पाऊल उचचले असले तरी हे संघटनेने उभारलेल्या लढ्याचे यश आहे, असे बी.टी.देशमुख यांनी आवर्जुन सांगितले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, नुटा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण रघुवंशी, सतेश्वर मोरे, सुधाकर वाहुरवाघ, पुंडलिक रहाटे, संगीता शिंदे, प्रशांत डवरे, मधुकर अभ्यंकर, रमेश चांदुरकर, माधव मुन्शी, पठाण आदी उपस्थित होते. प्रकृती खालावल्याने आतापर्यंत १५ जणांना इर्विनमध्ये दाखल करण्यात आले आहे. बुधवारी उमेश इंगोले, गजनान माळेकर, गजेंद्र पागृत या तीन शिक्षकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.