-----------------------
जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
अमरावती : १४ वर्षीय मुलीची छेडखानी करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पवन प्रमोद तल्हार (२५, रा. माहुली जहागीर) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. ही घटना नांदगाव पेठ हद्दीत ३० ऑगस्ट २०१८ रोजी घडली होती.
विधी सूत्रांनुसार, घटनेच्या दिवशी १४ वर्षीय मुलगी मैत्रिणीसोबत मोर्शीवरून अमरावतीकडे बसने शाळेत जात होती. बसमध्ये गर्दी असल्यामुळे ती दाराजवळ उभी होती. तिच्याच मागे पवन उभा होता. पवनने गर्दीचा फायदा घेऊन अश्लील वर्तन केले. मुलीच्या शरीराला स्पर्श केला. या प्रकाराबद्दल जाब विचारताच त्यानेच दोन कानाखाली लावीन, अशी धमकी मुलींना दिली. मुलींनी या घटनेची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकांना दिली. त्यानंतर मुलगी आईला घेऊन नांदगाव पेठ ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पवन तल्हारविरुद्ध गुन्हा नोंदविला.