शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांची बडनेरा ठाण्याला आकस्मिक भेट

By admin | Updated: January 29, 2015 23:00 IST

गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी बडनेरा पोलीस ठाण्याला गुरूवारी अकस्मात भेट देऊन पाहणी केली. पोलीस एखाद्या पोलीस ठाण्याला गृहराज्यमंत्र्यांनी आकस्मिक भेट देण्याची ही पहिलीच

बडनेरा : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी बडनेरा पोलीस ठाण्याला गुरूवारी अकस्मात भेट देऊन पाहणी केली. पोलीस एखाद्या पोलीस ठाण्याला गृहराज्यमंत्र्यांनी आकस्मिक भेट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ठाण्यात उपस्थित कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला. गुरूवारी सकाळी १० वाजता गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचा ताफा बडनेरा पोलीस ठाण्यासमोर थांबला. कोणतीही पूर्वसूचना नसल्याने काय झाले, हे तेथील कर्मचाऱ्यांना कळण्याच्या आत ना. रणजीत पाटलांनी ठाण्यात प्रवेश केला आणि पोलीस ठाण्याची पाहणी करण्यास सुरूवात केली. त्यांनी सर्वप्रथम स्टेश डायरी अंमलदार ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर ते थेट पुरूष आणि महिला बंदिगृहाकडे वळले. या दोन्ही बंदिगृहांचे त्यांनी बारकाईने अवलोकन केले. तेथील व्यवस्था तपासून आवश्यकतेनुसार सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. पश्चात गृहराज्यमंत्री बिनतारी संदेश खोली, क्राईम दप्तर खोली, स्वागत कक्ष, पोलीस निरीक्षकाचे कार्यालय, संगणक विभागाकडे वळले. याचवेळी त्यांनी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक आयुक्त साखरकर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू यांच्याकडून बडनेरा पोलीस ठाण्यात सन २०१३-१४ या दोन वर्षांत घडलेल्या एकूण गुन्ह्यांची माहिती घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास आलेल्या एका महिलेची गृहराज्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली. रणजीत पाटील तब्बल अर्धा तास पोलीस ठाण्यात थांबले. बडनेरा पोलीस ठाण्याला पहिल्यांदाच एखाद्या गृहराज्यमंत्र्यांनी भेट दिल्याने येथील कर्मचारी भांबावून गेले होते. पोलीस ठाण्याची पाहणी करून ते लगेच अमरावतीकडे रवाना झालेत. (शहर प्रतिनिधी)