शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

संत्रातोडीवर जाणाऱ्या ट्रकला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:13 IST

चौघे जखमी, जखमींमध्ये बालमजूरही परतवाडा : संत्री तोडण्यासाठी जाणाऱ्या ट्रकला परतवाडा-चांदूर बाजार मार्गावर त्रिवेणी संगमालगतच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात चार ...

चौघे जखमी, जखमींमध्ये बालमजूरही

परतवाडा : संत्री तोडण्यासाठी जाणाऱ्या ट्रकला परतवाडा-चांदूर बाजार मार्गावर त्रिवेणी संगमालगतच्या पुलाजवळ झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. मंगळवारी हा अपघात घडला. यात तीन बालमजूर असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

पोलीस सूत्रांनुसार, चांदूर बाजारच्या दिशेने निघालेल्या एमएच २७ एक्स ८१३२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये दहा ते पंधरा आदिवासी मजूर संत्री तोडण्यासाठी शिडी घेऊन जात होते. विरुद्ध दिशेने कापूस खाली करून घेत असलेल्या एमएच ०४ बीयू ८११६ क्रमांकाच्या वाहनाशी ट्रकची धडक झाली. यानंतर तो उलटला.

जखमींमध्ये अंकुश इवने, सीमा परते, रीता मांजरीवार या बालमजुरांसह शांता सलामे (५५) यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात अचलपूर येथे दाखल करण्यात आले. परतवाडा पोलीस घटनेची चौकशी करीत आहेत.