शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:11 IST

बडनेरा : हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेण्यात आले. ही घटना शनिवारी उघडकीस आली. कुटुंबीय मध्यरात्री झोपेतून ...

बडनेरा : हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेण्यात आले. ही घटना शनिवारी उघडकीस आली. कुटुंबीय मध्यरात्री झोपेतून उठल्यानंतर त्यांना घरात मुलगी दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु ती मिळाली नाही. त्यामुळे कुणीतरी पळवून नेल्याची शंका कुटुंबीयांना आली. या घटनेच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.

000000000000000000000

महिलेचा हात पकडून विनयभंग

अमरावती : एका महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना राजापेठ हद्दीतील झेंडा चौकात शनिवारी उघडकीस आली. अक्षय रामदास मंडवे (२८ रा. झेंडा चौक) असे आरोपीचे नाव आहे. महिला अंगणात कपडे वाळायला घालत असताना अक्षय हा घरात शिरला. त्याने हात पकडून विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अक्षय मंडवेविरुध्द विनयभंगाचा गुन्हा नोंदविला.

0000000000000000000000

तीन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

अमरावती : अवैध दारुची विक्री करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी विविध ठिकाणांवरून अटक केली. बडनेरा पोलिसांनी दाभा गावातील बसस्थानकाजवळ अविनाश अंबादास कोटांगळे (४१ रा. दाभा) याला अवैध दारूची विक्री करताना ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६६० रुपयांची दारू जप्त केली. नागपुरी गेट पोलिसांनी विठ्ठल नत्थुजी नाकतोडे (७० रा. नागोबा ओटा) याच्या ताब्यातून १ हजार ६० रुपयांची दारू जप्त केली. वलगाव पोलिसांनी रेवसा येथे एका महिलेच्या ताब्यातून ६०० रुपयांची दारू जप्त केली आहे.