शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

डीपीआरसाठी ९७ लाखांचा मोबदला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:04 IST

शहराचा चेहरामोहरा पालटविणारी योजना गर्भावस्थेत असताना त्या योजनेचा ‘डीपीआर’ बनविणाऱ्या कंपनीला ९७ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला.

योजना गर्भातच : लोकप्रतिनिधींचा आक्षेपअमरावती : शहराचा चेहरामोहरा पालटविणारी योजना गर्भावस्थेत असताना त्या योजनेचा ‘डीपीआर’ बनविणाऱ्या कंपनीला ९७ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला. प्रशासनाच्या या ‘घाई’च्या निर्णयावर काही नगरसेवकांनी टिकेची झोड उठविली आहे. बुधवारच्या आमसभेदरम्यान राष्ट्रवादी फ्रंटचे नगरसेवक मिलिंद बांबल यांनी या मुद्यावर प्रशासनाला घेरण्याची तयारी केली आहे. महापालिका हद्दीतील विविध परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता तसेच मोठ्या व छोट्या नाल्यांच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. यात स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टिमसह आवश्यक असलेल्या नाल्यांच्या भागाला संरक्षणभिंत बांधण्याचा समावेश या योजनेत आहे. यासाठी पुणे येथील युनिटी कन्सल्टंट या कंपनीशी करार करण्यात आला. या एजन्सीने तब्बल ३७५.६७ कोटी रुपयांचा डीपीआर बनवला. सदर प्रस्ताव तांत्रिक मान्यतेकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. वस्तुत: यंदा अमृत अभियानातून शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी १२२ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी निधी मिळण्याची सुतराम शक्यता नाही. तद्वतच डीपीआर फुगल्याने शासनाने इतका मोठा निधी देण्यास स्पष्ट नकार दिल्याचेही महापालिका सूत्रांनी सांगितले. मात्र योजनेला तांत्रिक मंजुरी मिळण्याआधी आणि निधीची कुठलीही तरतूद नसताना पालिकेने डीपीआर बनविणाऱ्या पुणेरी कंपनीला ९७.१४ लाख रुपयांचा मोबदला देण्याची घाई का केली? हे अनुत्तरीत आहे. नगरसेवक पाच लाखांच्या कामासाठी यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करतात. मात्र त्यांना निधी मिळत नाही. त्या अनुषंगाने डीपीआरनी घेतलेली कोट्यवधीची उड्डाणे महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेतील ‘आर्थिक’ घाईवर प्रश्नचिन्ह लावणारी आहे. (प्रतिनिधी)डीपीआर तयार करण्याकरिता कंपनीला ९७.१४ लक्ष मोबदला देण्यात आला. हा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेकरिता पाठविला आहे. युनिटी कन्स्लटंट पुढेही मंजुरी प्रक्रियेदरम्यान मदत करणार आहे. - अनंत पोतदार, कार्यकारी अभियंता, महापालिका