शिक्षक बँक निवडणूक : १९ उमेदवारांची माघारअमरावती : ७ नोव्हेंबरला होणाऱ्या अमरावती जिल्हा परिषद सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ९५ उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ११४ पैकी १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर २१ संचालकांसाठी होत असलेल्या या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. प्रगती, समता, परिवर्तन आणि युवाशक्ती पॅनेलच्या प्रत्येकी २१ उमेदवारांसह इतर ११ उमेदवारही रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. प्रथमच ही निवडणूक चौरंगी आणि अटीतटीची होण्याचे संकेत आहेत. उल्लेखनीय म्हणजे प्रथमच जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा परिषदेचा कर्मचारी संवर्गातून एक संचालक निवडला जाणार आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ९५ जण रिंगणात असून २६ आॅक्टोबरला रोजी उमेदवारांना चिन्हवाटप होणार आहे. शिक्षक मतदारसंघातून ६६१५ तर जि.प. कर्मचारी संवर्गात १३३९ मतदार आहेत. सर्वसाधारण मतदारसंघातून १५ तथा इतर मागासवर्ग, विजा-भज, अनुसूचित जाती-जमाती आणि जिल्हा परिषद कर्मचारी संवर्गातून प्रत्येकी १ आणि महिला राखीवमधून २ संचालक निवडले जातील. निवडणुकीतील चुरस हळूहळू वाढू लागली आहे.
९५ उमेदवारांमध्ये रंगणार काट्याची लढत
By admin | Updated: October 24, 2015 00:05 IST