शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

६१ विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांची खांदेपालट

By admin | Updated: May 11, 2016 00:32 IST

जि.प. प्रशासनाच्या वतीने वर्ग तीन आणि चार मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया ७ मे शनिवारपासून सुरू झाली आहे.

बदली प्रक्रिया : ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक बदललेअमरावती : जि.प. प्रशासनाच्या वतीने वर्ग तीन आणि चार मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया ७ मे शनिवारपासून सुरू झाली आहे. बदली प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी व ६१ ग्रामसेवकांच्या बदल्या केल्या आहेत. यात पंचायत विभागाने आपसी, विनंती, प्रशासकीय अशा बदल्या केल्या आहेत.जिल्हा परिषद प्रशासनातर्फे दरवर्षी मे महिन्यात बदलीची प्रक्रिया राबविले जाते. यंदाही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून समुपदेशनाव्दारे सार्वत्रिक बदल्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष सतीश उईके, सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जे.एन आभाळे यांच्या उपस्थित सुरू झाली आहे. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायक, स्थापत्य अभियंता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सिंचन विभागातील चार कर्मचाऱ्यांच्याा प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या अशा एकूण १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत विभागाने मंगळवारी दोन विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय दोन, १ विनंती, तर ग्रामविकास अधिकारी प्रशासकीय १ विनंती २ आपसी चार ग्रामसेवकांच्या १७ प्रशासकीय, २२ विनंती, आणी १२ ग्रामसेवकांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत. अशा एकूण ६१ बदल्या केल्या आहेत. यावेळी अध्यक्ष सतीश उईके, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जे.एन आभाळे, जिल्हा परिषद कर्मचारी पकंज गुल्हाने, श्रीकांत मेश्राम, प्रशांत धर्माळे, हृषीकेश कोकाटे, विजय कविटकर, सुदेश तोटेवार, कल्पना दाभाडे, ईश्र्वर राठोड आदीचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)महिला, बालकल्याण बदल्या १४ मे रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी पंचायत, महिला व बालकल्याण विभागाच्या बदल्या करण्याचे जाहीर केले होते. मात्र अचानक काही तांत्रिक कारणामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या बदल्या १० मे रोजी रद्द क रण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ पंचायत विभागाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या बदल्या १४ मे रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.