शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

५३ हजार अमरावतीकरांना घरकुलांची प्रतीक्षा

By admin | Updated: July 30, 2016 00:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील ५३ हजार अमरावतीकरांना घरकुलांची प्रतीक्षा लागली आहे.

 निधीसाठी हवा पाठपुरावा : केवळ ७ हजार १८ घरे मंजूरअमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील ५३ हजार अमरावतीकरांना घरकुलांची प्रतीक्षा लागली आहे. यापैकी ७,०१८ घरकुले मंजूर असली तरी त्यांनाही वर्षभरात घरे मिळण्याची सुतराम शक्यता नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचा चार घटकांतर्गत लाभ मिळतो. अमरावती महापलिका क्षेत्रातून पहिल्या घटकासाठी १२,४३२, दुसऱ्या घटकासाठी ४,७००, तिसऱ्या घटकासाठी १५,४६० व चौथा घटकासाठी २०,९६३ अशी एकूण ५३ हजार ५५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील घटक क्र. ३ अंतर्गत ८६० सदनिका मंजूर झाल्यात, तर घटक क्रमांक ४ मध्ये २०,९६३ पैकी ६,१५८ घरांचा डीपीआर मंजूर झाला आहे. २ जुलैला या घटकांतर्गत 'फर्स्ट अ‍ॅप्राझल' मंजूर झाला. याशिवाय ८६० सदनिकांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविाला आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या कार्यकाळात पीएम आवास योजनेच्या प्रक्रियेला गती मिळाली होती. मात्र तूर्तास ही प्रक्रिया कुर्मगतीने सुरू आहे.८६० सदनिकांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्याचा दावा होत असला तरी शहरातील ७,०१८ घरे मूर्तरुपास येण्यासाठी कोट्यवधींच्या निधीची गरज आहे. त्यामुळे केंद्र व राज्यस्तरावर भक्कम पाठपुरावा केल्यानंतरच या प्रक्रियेला गती मिळणार आहे. १८ आर्किटेक्टसोबत सामंजस्य करार २९ एप्रिलला ६१५८ लाभार्थ्यांना तांत्रिक मार्गदर्शनाखाली प्लॅन तयार करणे आणि घरांचे बांधकाम करून घेण्यासाठी १८ आर्किटेक्टसोबत सामंजस्य करार करण्यात आला. यासाठी केंद्र सरकारकडून १०५.२७ कोटी आणि राज्य शासनाकडून ७०.१८ कोटी रुपये प्राप्त होतील. हा निधी तीन टप्प्याने मिळेल. त्यासाठी राजकीय महत्त्वाकांक्षा व पाठपुरावा हवा. सनियंत्रण समितीची बैठकराज्यस्तरीय समितीने १६ मार्च २०१६ च्या बैठकीत ५१ प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यानंतर २८ एप्रिलला केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीची बैठक झाली. या बैठकीत ५२ प्रकल्पांपैकी ५ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेने सादरीकरण केले. त्यानंतर केंद्रीय समितीने ६,१५८ लाभार्थ्यांमार्फत बांधकाम करावयाच्या घरकूल प्रस्तावास निधी देण्यास मंजुरी दिली. शहरस्तरीय तांत्रिक कक्ष केव्हा ? या अभियानांतर्गत संबंधित शहरांकरिता मार्गदर्शक सूचनानुसार तज्ञांची चारपर्यंत नियुक्ती करणे आवश्यक आहे. या नियुक्त्यांना केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समितीची मान्यता आवश्यक असताना शहराच्या आकारमानानुसार शहरस्तरीय तांत्रिक कक्ष नेमला गेला नाही. अर्थात चार तज्ञांची निवड करण्यात आलेली नाही. पंतप्रधान आवास योजनेतील चार घटक घटक क्रमांक १- जमिनीचा साधनसंपत्त म्हणून वापर करून त्यावारील झोपडपट्ट्यांचा ‘आहे तेथेच’ पुनर्विकास करणे. घटक क्रमांक २- कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक दृष्टया दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे. घटक क्र. ३- भागिदारी तत्त्वावर परवडणारी घरे निर्माण करण्याचे प्रकल्प घटक क्र. ४- वैयक्तिक घरकूल बांधण्याचे प्रकल्प