शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत ५० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी

By admin | Updated: October 8, 2016 00:13 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाची फळी तयार करायची आहे.

 शरद पवार : स्थानिक स्वराज्य संस्थांचे रणशिंग फुंकलेअमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाची फळी तयार करायची आहे. त्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, ही बाब राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केली.स्थानिक देशमुख लॉनमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘रणशिंग’ विभागीय मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार यांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज्याची प्रगती साधण्याची भूमिका मांडली. नवी फळी तयार करून राष्ट्रवादीला इतिहास रचायचा आहे. कर्तृत्ववान नेतृत्व तयार करण्याचे आवाहन करताना पवारांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले. यश तुमचेच आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, मनोहर नाईक, अरूण गुजराथी, राजेंद्र शिंगणे, सुभाष ठाकरे, शरद तसरे, हर्षवर्धन देशमुख, वसुधाताई देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ. संदीप बाजोरीया, राजकुमार पटेल, आ. ख्वाजा बेग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, वसंत घुईखेडकर, बाबा राठोड, शेखर भोयर, गणेश खारकर, मेघा हरणे, स्मिता घोगरे आदी उपस्थित होते. प्रस्ताविक सुनील वऱ्हाडे, संचालन क्षीप्रा मानकर, तर आभार बाबा राठोड यांनी मानले. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. (प्रतिनिधी)तिवस्यात शाई फेकण्याचा प्रयत्न फसलातिवसा : शरद पवार मोटारीने अमरावतीकडे जात असताना शुक्रवारी तिवस्यात त्यांचे स्वागत करताना शाई फेकण्याचा व काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी राज माहोरे यांना तिवसा पोलिसांनी ताब्यात घेतले. शाई फेकण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्तरीत्या मिळाली होती. मोहोरे यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.