शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
4
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
5
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
6
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
7
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
8
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
9
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
10
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
11
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
12
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
13
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
14
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
15
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
16
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
17
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
18
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
19
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
20
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या प्रकल्पांवर रेल्वेमंत्र्यांशी ४५ मिनिटे चर्चा

By admin | Updated: April 18, 2015 00:00 IST

जिल्ह्यात रखडलेले रेल्वेचे विविध प्रकल्पांचे काम पूर्णत्वास यावे यासाठी आ. रवी राणा यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची बुधवारी भेट घेऊन ४५ मिनिटे चर्चा केली.

रवी राणांचा पुढाकार : दिल्ली येथील रेल्वे भवनात बैठकअमरावती : जिल्ह्यात रखडलेले रेल्वेचे विविध प्रकल्पांचे काम पूर्णत्वास यावे यासाठी आ. रवी राणा यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची बुधवारी भेट घेऊन ४५ मिनिटे चर्चा केली. यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी रखडलेल्या प्रकल्पांचे काम मार्गी लावण्याची हमी दिली.नवी दिल्ली येथील रेल्वे भवनात आ. राणा यांच्या पुढाकाराने रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांचे प्रश्न सुटावे, यासाठी थेट रेल्वेमंत्री प्रभू यांना साकडे घातले. यावेळी रेल्वेमंत्री प्रभू यांनी जिल्ह्यात रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मध्य रेल्वे मुंबई विभागाचे महाप्रंबधक सुनीलकुमार सूद, प्रधान मुख्य अभियंता कुलशस्त्र, भुसावळ विभागाचे प्रबंधक सुधीर गुप्ता, ओ.पी. सिंग, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक चंद्राकार, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल, संजीव कुमार आदींना दिले. दरम्यान बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यात प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी कुटुंबातील एका सदस्याला नोकरीत सामावून घेण्यात यावे. अचलपूर- मूर्तिजापूर- यवतमाळ शकुंतला ही ब्रॉडगेजमध्ये सुरु करावी. बडनेरा येथील रेल्वे पुलाच्या चौपदरीकरणासाठी ३३ कोटी रुपये उपलब्ध करुन द्यावेत. बडनेरा रेल्वे स्थानकावर एक अतिरिक्त प्लॅटफार्मची निर्मिती करण्यात यावी. राजापेठ रेल्वे उडड्डाणपुलाच्या कामांना गती देण्यात यावी. मुंबई-दिल्लीकडे ये-जा करण्यासाठी नवीन गाड्या सुरु करण्यात याव्यात. नागपूर- मुंबई दुरंतो या गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा. नवाथे अंडरपाथचे काम सुरु करण्यात यावे. अमरावती-सुरत एक्स्प्रेस ही आठवड्यातून पाच दिवस चालविण्यात यावी आदी मागण्यांची यादी रेल्वेमंत्र्यांच्या पुढ्यात ठेवली.