शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

४४.४४ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मंत्रालयात

By admin | Updated: June 26, 2014 23:01 IST

अमरावती व बडनेरा शहराकरिता आवश्यक असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न त्वरेने निकाली काढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सचिवांना पत्र पाठवून पाणी पुरवठ्याची समस्या

अमरावती : अमरावती व बडनेरा शहराकरिता आवश्यक असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न त्वरेने निकाली काढावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट सचिवांना पत्र पाठवून पाणी पुरवठ्याची समस्या शासन दरबारी पोहचविली आहे. या गंभीर प्रश्नावर मंत्रालयात विशेष बैठक लावण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रधान सचिव राजेशकुमार यांना पाठविलेल्या पत्रात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी महानगरात पाणीपुरवठयासंदर्भात उद्भवलेली समस्या विशद केली आहे. काही महिन्यापूर्वी माजी आ. संजय बंड यांच्या नेतृत्वात नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, ही मागणी पोटतिडकीने मांडली होती. निवेदनाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रलंबित असलेल्या ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजना लवकर मंजूर करुन जनतेला दिलासा देण्याची मागणी केली आहे. २८ एप्रिल २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पाठविलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रश्नांबाबत अद्यापपर्यंत वरिष्ठ स्तरावर हालचाली नसल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधींनीसुध्दा या विषयावर शासनाकडे पाठपुरावा केला नसल्याचे दिसून येते.नगरोत्थानतंर्गत ४४.४४ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजना थंड बस्त्यात असल्याने जीवन प्राधिकरणाला पाणीपुरवाठा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही भागात अवेळी पाणी पुरवठा होत असल्याने जनतेच्या रोषाचा सामनादेखील करावा लागत आहे. हल्ली पावसाळा सुरु झाला असला तरी पाऊस बरसला नसल्याने पाण्याचा वापर हा उन्हाळ्याप्रमाणेच सुरु आहे. पाण्याची मागणी वाढली असून पाणी पुरवठ्यासाठी लागणारी यंत्रणा अपुरी असल्याने पाणी पुरवठा कसा करावा, असा प्रश्न जीवन प्राधिकरण विभागापुढे निर्माण झाला आहे. जीवन प्राधिकरणकडे पाणी भरपूर आहे; मात्र पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारण्यासाठी निधीची गरज आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पत्र पाठवून नगरोत्थानअंतर्गत ४४.४४ कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे. (प्रतिनिधी)