अंदाजपत्रकात सुधारणा : ४० लाखांचा वॉर्डविकास निधी अमरावती : मालमत्ता करात ४० टक्के दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने अमान्य केला आहे. हा प्रस्ताव आमसभेत आल्यानंतरही त्यास जोरकस विरोध करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी दिली. आयुक्तांनी मांडलेल्या सुधारित व मूळ अंदाजपत्रकात स्थायी समितीने काही सुधारणा सूचविल्याचे ते म्हणाले.प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त ४० टक्के वाढ लादण्यापेक्षा करचोरी करणाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या सूचना स्थायी समितीने दिल्या आहेत. बड्या थकबाकीधारकांना राजाश्रय न देता त्यांच्याकडून ती वसूल करण्यासाठी प्रशासनाने कार्यक्रम राबवावा, अशा सूचना रविवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत देण्यात आल्यात. प्रशासनाने मांडलेल्या सुमारे ७४० कोटींच्या अंदाजपत्रकावर यावेळी काही सुधारणा सुचविण्यात आल्यात. शुक्रवारी स्थगित केलेली स्थायी समितीची बैठक रविवारी दुपारी १ वाजता घेण्यात आली. याबैठकीला आयुक्तांसह सर्व विभागप्रमुख आणि स्थायीचे सदस्य उपस्थित होते. मालमत्ता करात प्रस्तावित ४० टक्के दरवाढीला विरोध करतानाच ज्या मालमत्ता कराच्या अखत्यारित नाहीत, ज्या मालमत्तांचा वापर बदलला आहे आणि ज्या मालमत्तांमध्ये परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करण्यात आले आहे, असे आहे अंदाजपत्रकअमरावती : त्यासर्व मालमत्ता तीन महिन्यांत शोधण्याच्या सूचना देण्यात आल्यात. सायबरटेकने पालिका प्रशासनाला ठेंगा दाखविल्याच्या पार्श्वभूमीवर आता मालमत्ता कर वाढविण्याची ‘कसरत’ प्रशासनाने करावी, असे निर्देश भारतीय यांनी दिले आहेत. तत्पूर्वी आयुक्त हेमंत पवार यांनी अंदाजपत्रक सादर केले, त्यानुसार सन २०१७-१८ वर्षात महापालिकेची प्रारंभिक शिल्लक १६९.१० कोटी असून यामध्ये महसुली शिल्लक ३२.६८ कोटी, भांडवली शिल्लक १२७.७८ कोटी, असाधारण ऋण व निलंबन शिल्लक ८.६४ कोटींचा समावेश आहे. सर्व बाजुंनी मिळणारे एकंदर उत्पन्न ५७१.७३ कोटी असून यामध्ये महसुली उत्पन्न ३०८.८२ कोटी, भांडवली उत्पन्न २४९.०६ कोटी व असाधारण ऋण व निलंबन उत्पन्न १३.८५ कोटींचा समावेश आहे. असे एकूण ५७१.७३ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित आहे. परंतु भांडवली खर्चाकरिता प्रारंभिक शिल्लक १२७.७८ कोटी व भांडवली उत्पन्न २४९.०६ कोटी असे एकूण ३७६.८४ कोटी प्राप्त निधीचा विनियोग शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार करावा लागतो. त्यामुळे मनपाकडील प्रारंभिक महसुली शिल्लक ३२.६८ कोटी व मनपाचे एकूण महसुली उत्पन्न ३०८.८२ कोटी असे एकूण ३४१.५० कोटी इतके महसुली उत्पन्न असून यामधूनच मनपाला थकीत व आवश्यक खर्चाची कामे करावी लागतात. सन २०१७-१८ करीता एकूण खर्च ६२२.६५ कोटी इतका अपेक्षित आहे. यामध्ये महसुली खर्च ३३६.०९ कोटी, भांडवली खर्च २७२.७१ कोटी व असाधारण ऋण व निलंबन खर्च १३.८५ कोटींचा समावेश आहे. वर्षाअखेर अखेरची महसुली शिल्लक ५.४१ कोटी, भांडवली अखेरची शिल्लक १०४.१३ कोटी व असाधारण ऋण व निलंबन अखेरची शिल्लक ८.६४ कोटी अशाप्रकारे एकूण ११८.१८ कोटी शिल्लक राहतील. सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून मालमत्ता कराचे मूल्यांकन करून ४० टक्के वाढ गृहित धरण्यात आली आहे. प्रत्येक वस्तू, सेवा, बांधकाम साहित्य महापालिकेची लोकसंख्या व क्षेत्रफळ याचा विचार करता पुढील वर्षात भांडवली मूल्यावर करआकारणी करून कर पुनर्मूल्यनिर्धारण अपेक्षित आहे. त्याकरिता अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी तसेच जनता यांचेकडून आयुक्तांना सहकार्य अपेक्षित आहे.आर्थिक काटकसरीचे वर्षसन २०१७-१८ हे आर्थिक वर्ष काटकसरीचे वर्ष राहिल.त्यामुळे प्रशासनावर आर्थिक गंडांतर येऊ नये, म्हणून पदाधिकाऱ्यांपासून काटकसरीला सुरुवात केली जाईल. त्याअनुषंगााने इंधनबचत केली जाईल. अर्थसंकल्प वस्तुनिष्ठ करतानाच उत्पन्नवाढीसाठी व्यावसायिक संकुलाच्या भाडेकराराची नव्याने चाचपणी केली जाईल. अर्थसंकल्पात स्काउट-गाईडसह सेवानिवृत्तांसाठी खास तरतूद देखील केली जाणार आहे.कर्मचाऱ्यांच्या वेतनाला प्राधान्य महापालिका कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे.एलबीटीच्या अनुदानावर अवलंबून न राहता महापालिकेचे उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे.याशिवाय शासनाक डे थकीत निधीसाठी मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे स्थायी समितीत ठरविण्यात आले.
४० टक्के दरवाढीचा प्रस्ताव स्थायीत अमान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 00:04 IST