शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अवैध चराई करताना ४० गुरे पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:17 IST

राखीव जंगलक्षेत्रात अवैध चराई करताना ४० गुरे पकडून रविवारी जनावरांच्या मालकावर कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देडीएफओंची धडक मोहीम : चांदूर रेल्वे, सावंगा जंगलात कारवाई

आॅनलाईन लोकमतपोहरा (बंदी) : राखीव जंगलक्षेत्रात अवैध चराई करताना ४० गुरे पकडून रविवारी जनावरांच्या मालकावर कारवाई करण्यात आली. चांदूर रेल्वे व सावंगा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी भुरा मीर (२४, चिरोडी) याला अटक केली.अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीणा हे चांदूर रेल्वे, पोहरा येथे जंगल संरक्षणाच्या अनुषंगाने गेले असता चिरोडी वनखंड क्रमांक २२२ मध्ये २४ काठेवाडी गुरे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी डीएफओ मीणा यांच्यासोबत वनसंरक्षक अशोक कविटकर हेदेखील होते. यावेळी मीणा यांनी ही गुरे स्वत: पकडून वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलेत. पुढे सावंगा जंगल क्षेत्रात ते फिरस्तीवर असताना गवत रमना या वनखंड क्रमांक ३०९ मध्ये अवैध चराई करताना १६ गुरे दिसून आले. अवैध चराई करतानाचे गुरे पकडून ते संबंधित वनकर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी दोन वनगुन्हे जारी करण्यात आले आहे. डीएफओ मीणा यांनी अवैध चराई रोखण्यासाठी धडक मोहीम हाती घेणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कारवाई दरम्यान चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्राधिकारी आशिष कोकाटे, वर्तुळ अधिकारी एम.के. निर्मळ, सतिश नाईक, अभिजित कथलकर,शेख रफिक आदी उपस्थित होते.