शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांत ३७,१२३ कोरोनाग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हातील कोरोना संसर्गाला गुरुवारी ११ महिने पूर्ण झाले. या कालावधीत जिल्ह्यात ३७,१२३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. म्हणजेच रोज ...

अमरावती : जिल्हातील कोरोना संसर्गाला गुरुवारी ११ महिने पूर्ण झाले. या कालावधीत जिल्ह्यात ३७,१२३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. म्हणजेच रोज सरासरी १११.१५ रुग्णांची या काळात नोंद झालेली आहे. यात सर्वाधिक रुग्ण सप्टेंबरमध्ये ७,२०० व फेब्रुवारीत १३,३९० नोंदविण्यात आले आहे.

जिल्ह्यात ४ एप्रिल २०२० ला हाथीपुऱ्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली होती व हा रुग्ण ‘होमडेड’ होता, त्यानंतर महिनाभरात चार कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. नंतर मात्र, कोरोना संसर्ग वाढायला लागला व आता ३८ हजारांच्या घरात रुग्णसंख्या आलेली आहे. मृत्यूचे प्रमाण सुरुवातीला आठ टक्क्यांवर होते. त्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याने मृत्यूचा दर माघारला. याशिवाय डिस्चार्ज प्रमाणातही वाढ झालेली आहे.

सुरुवातीच्या काळात कोरोनाग्रस्ताला १५ दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जात होता. १४ दिवसांनंतर सलग दोन नमुने अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णांना घरी सोडण्यात येत होते व त्यानंतरही त्याने एक आठवडा होम क्वारंटाईन राहण्यासाठी रुग्णाजवळून लेखी घेण्यात येत होते. मात्र, जसजशी रुग्णसंख्या वाढायला लागली तसतशी डिस्चार्जच्या दिवसांमध्ये कमी यायला लागली. त्यानंतर १० व्या दिवशी व आता तर कोरोनाग्रस्तांना सहाव्या दिवशीच डिस्चार्ज देण्यात येत आहे.

कोरोना संसर्गाचे ११ महिन्यांनंतर आरोग्य यंत्रणेलाही आता विश्रांतीची गरज असताना अन्य पर्याय नसल्याने कोरोनायोद्धे जिवाची पर्वा न करता सतत काम करीत आहे. मे-जूनमधील वातावरणात पीपीई कीट घालून काम करणे सोपे नाही. मात्र, आरोग्य यंत्रणेद्वारे हे अवघड आव्हानाचा रोज सामना केला जात आहे.

पाईंटर

अशी वाढली रुग्णसंख्या

दिनांक कोरोनारुग्ण

एप्रिल २०२० : ०५

मे २०२० : २३०

जून २०२०: ५९२

जुलै २०२० :२२२८

ऑगस्ट २०२० : ५८९८

सप्टेंबर २०२० : १३५५७

ऑक्टोबर २०२० :१६३४९

नोव्हेंबर २०२० :१७,९२२

डिसेंबर २०२० :१९,७९८

जानेवारी २०२१ : २१९७९

फेब्रुवारी २०२१ : ३५८१६

४ मार्च २०२१ : ०००००

बॉक्स

३३४ दिवसांतील कोरोना संसर्गाचे काळात सुरुवातीला ‘होमडेड’ व्यक्तींची नोंद झाल्याने ‘डेथ रेट’ वाढला होता. त्यानंतर मात्र, हायरिस्कच्या व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेतले जात असल्याने मृत्यूचा दर माघारला, त्यानंतर जसजशी रुग्णसंख्या वाढायला लागली तसा मृत्यू दर कमी झालेला आहे. आता रोज ७०० ते ९०० पर्यंत रुग्णसंख्या नोंद होत असताना ‘डेथरेट’ १.४५ टक्क्यांवर आलेला आहे.

बॉक्स

महापालिका क्षेत्रात २५ हजार, ग्रामीणमध्ये १२ हजार रुग्णांची नोंद

या काळात महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २५ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली, तर या कालावधीत ग्रामीणमध्ये १२ हजार रुग्णांची नोंद झालेली आहे. आता महापालिका क्षेत्रच कंटेनमेंट झोन घोषीत केले आहे. मात्र, कंटेनमेंटचे कोणतेही निकष पाळल्या जात नाहीत. याशिवाय ग्रामीणमध्ये भातकुली नगरपंचायत, अचलपूर व अंजनगाव सुर्जी नगरपंचायत व लगतचा परिसरही कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आलेले आहे.

बॉक्स

फेब्रुवारीत रोज सरासरी ४७८.२१ रुग्णांची नोंदकोरोना संसर्गचे काळात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची नोंद फेब्रुवारी महिन्यात झाली. यामध्ये १३,३९० रुग्ण निष्पन्न झालेत तर या महिन्यात तब्बल ९४ संक्रमितांचे मृत्यू झालेले आहेत. यापूवी सप्टेंबर महिन्यात कोरोनाने जिल्ह्यास हादरा दिला होता. फेब्रुवारी महिन्यात तर कहरच झालेला आहे. या २८ दिवसांत रोज सरासरी उच्चांकी ४७८.२१ रुग्णांची नोंद झालेली आहे.