लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेला पाऊस व यंदाचा दाहक उन्हाळा, यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उर्वरित १० प्रकल्पांत केवळ ४ टक्केच साठा शिल्लक आहे. तोही मृतसाठा असल्याने मे महिन्यात स्थिती भीषण झालेली आहे.सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचे अनिष्ट परिणाम आता जाणवायला लागले आहेत. जिल्ह्यातील एकमेव मुख्य प्रकल्प असलेला अप्पर वर्धा प्रकल्पात डिसेंबर महिन्यात परतीच्या पावसाची मध्यप्रदेशातून आवक वाढल्याने १०० टक्के जलसाठा झाला होता. त्यामुळे स्थिती भक्कम असली तरी मध्यम प्रकल्प असलेल्या शहानूर प्रकल्पात सद्यस्थितीत ४० टक्के, पुर्णा प्रकल्पात ३० टक्के तर चंद्रभागा प्रकल्पात ३१ टक्केच साठा शिल्लक आहे. या प्रकल्पात किमान ५ ते १० टक्के मृतसाठा गृहीत धरता व सध्याच्या उष्णतेच्या लाटेत वाढलेला बाष्पीभवणाचा वेग पाहता स्थिती गंभीर आहे. अशीच स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास मे अखेरीस स्थिती गंभीर होणार आहे.सद्यस्थितीत ४५ लघुप्रकल्पांपैकी घातखेड १८ टक्के, दस्तापूर १२, सातनुर १२, जामगाव ७, खारी ४, साद्राबाडी ५, रभांग ३, ज्युटपानी १८, पुसली ४, नांदूरी १२ व चारगड प्रकल्पात ४ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.हे लघुप्रकल्प कोरडेजिल्ह्यात सद्यस्थितीत साखळी, पिंपळगाव, मालेगाव, केकतपूर, सुर्यगंगा, दहिगाव धानोरा, कतिजापूर, गोंडवाघोली, गोंडविहीर, सावरपाणी, टोंगलफोडी, मालखेड, बासलापूर, सरस्वती, टाकळी, भिवापूर, जळका, अमदोरी, दाभेरी, सातनुर, जामगाव, बेलसावंगी, नागठाणा, सावलीखेडाम बोबदो, सालई, बेरदा, गंभेरी आदी प्रकल्प साठ्याअभावी कोरडेठाक पडले आहेत.
३५ लघुप्रकल्पांना कोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:31 IST
गतवर्षी सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेला पाऊस व यंदाचा दाहक उन्हाळा, यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ४६ लघु प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उर्वरित १० प्रकल्पांत केवळ ४ टक्केच साठा शिल्लक आहे. तोही मृतसाठा असल्याने मे महिन्यात स्थिती भीषण झालेली आहे.
३५ लघुप्रकल्पांना कोरड
ठळक मुद्देभूजलात घसरण : ४६ लघुप्रकल्पांत ४ टक्केच साठा