शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

३२ ग्रामपंचायतींना हक्काचा अभियंता

By admin | Updated: November 19, 2014 22:31 IST

अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात.

अमरावती : अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जात आहे. परंतु त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकारीच नसतात. यामुळे विकासात अडसर निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींना हक्काचे अभियंता कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केले आहेत. त्यामुळे तेथील कामांना वेग येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकासकामांची अंदाजपत्रके तयार करणे, कामांचे मूल्यांकन करणे आदी कामे पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर करण्यात येतात. यामध्ये बराच कालावधी जात असल्याने विकासकामे होण्यास उशीर लागतो. यासाठी शासनाने ग्रामपंचायतस्तरावर विकासकामांचे मूल्यांकन होऊन अंदाजपत्रके झाल्यास कामे अधिक सुलभ व लवकर होतील. या हेतूने शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या विविध विकास कामांसाठी हे अभियंते तांत्रिक सल्ल्यासह कामांची अंदाजपत्रके तयार करतील. त्याचबरोबर त्याकामांची निविदा प्रक्रिया राबवून कामपूर्ण होईपर्यंत देखरेख करणे, तसेच कामाच्या मूल्यांकनासह पूर्णत्वाचा दाखलाही हे अभियंते देणार आहेत. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये या अभियंत्यांची निवड केली आहे. या अभियंत्यांच्या नियुक्त्या जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी केली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अभियंता नियुक्त करण्यात आल्यामुळे विकास कामांना वेग येणार आहे. त्यामुळे वाडी, वस्त्याच्या विकासाला चालना मिळू शकेल. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांसाठी व इतर प्रस्तावांची तांत्रिक छाननी करणे, कामांची अंदाजपत्रके निविदा प्रक्रिया करणे, वेळप्रसंगी कामांवर देखरेख ही कामे त्या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. (प्रतिनिधी)