शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

सहा वर्षांत ३१ ग्रामसेवकांच्या आत्महत्या

By admin | Updated: December 26, 2015 00:14 IST

ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे व १२० योजनांच्या अधिभाराने मानसिक तणावात असून...

कामाचा वाढता ताण : ५३ जणांवर प्राणघातक हल्लेमोहन राऊत अमरावतीग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेला ग्रामसेवक राजकीय पुढाऱ्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे व १२० योजनांच्या अधिभाराने मानसिक तणावात असून मागील सहा वर्षांत विदर्भातील ३१ ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्यात, तर ५३ जणांवर गावांच्या राजकारणावरून प्रााणघातक हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ अमरावती विभागातील अमरावती, यतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम या पाच जिल्ह्यात ३ हजार १३० ग्रामसेवक कार्यरत आहे़एक ते दोन हजार लोकसंख्याच्या मागे एक ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते़ १५ हजार लोकसंख्योच्या गावांसाठी ग्रामविकास अधिकारी नेमण्यात येतो. आज प्रत्येक शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसोबत वेतनश्रेणी मिळते. परंतु राज्यातील एकमेव ग्रामविस्तार अधिकाऱ्यांचे हे पद आहे की तब्बल एवढा मोठा गाडा हाकताना वेतनश्रेणी मिळत नाही़ अनेक ग्रामविकास अधिकारी आजही जिल्ह्यात वेतनश्रेणी पासून वंचित आहे़ या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कामांचा भार अधिक वाढत आहे़ या ग्रामसेवकांना तीन वर्षांनंतरही कायमस्वरूपी केले नाहीत़ एकाच ग्रामसेवकाकडे चार ग्रामपंचायतींचा अधिभारगावातील घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यापासून तर गावातील स्वच्छता, आरोग्य, ग्रामसभा घेणे असे विविध कामे ग्रामसेवकांना सांभाळावी लागतात. मात्र, एकाच ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा अधीभार असल्यामुळे या ग्रामसेवकाला ताण सहन करावा लागतो़ पूर्वी गावातील मोजकी कामे या ग्रामसेवकांकडे होती़ आता केन्द्र व राज्य शासनाच्या १२० योजनांची माहिती व पाठपुरावा करण्याची जबाबदारी या ग्रामसेवकावर आली आहेत़ दररोज मंत्रालयातून निघालेला शासकीय अध्यादेश जि़प़ व पं़स़ पर्यंत पोहोचताच त्याच दिवशी माहिती मागण्याचे कार्य वरिष्ठ स्तरावरून होत असल्याने ग्रामसेवकांना अडचणीला सामोरे जावे लागते़ तांत्रिक कामाची आगाऊ जबाबदारी पूर्वी ग्रामसेवकाला ग्रामपंचायतींमध्ये सदर कामाचा ठराव घेऊन वरिष्ठ विभागाला पाठविण्याचे काम होते़ परंतु आता थेट महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसारख्या कामाची जबाबदारी ग्रामसेवकावर देण्यात आली आहे़ एकीकडे गावात दोन गटात निर्माण होणारे तंटे तर दुसरीकडे बांधकाम विभाग ग्रामसेवकाकडे दिल्याने ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडावे लागते. निवृत्ती नंतरही होतोय अन्याय जिल्ह्यातील ग्रामसेवक सेवा निवृत्त होऊनही त्यांना निवृत्तीवेतन मिळत नाही़ जिल्हा परिषद हा विभाग ग्रामसेवक ज्या गावातून सेवानिवृत्त झाला त्या गावातील कामाचे नाहरकत प्रमाणपत्र मागते़ सदर प्रमाणपत्र देण्यास पंचायत समिती अनेक महिने लावत असल्यामुळे या ग्रामसेवकाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे युनियनचे उपाध्यक्ष बबन कोल्हे म्हणाले.