शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बगाजी सागरचे ३१ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST

शिदोडीत शिरले पाणी ११४ घराची पडझड फोटो - बगाजी सागर ०७ पी धामणगाव रेल्वे : बगाजी सागर धरणात ९५ ...

शिदोडीत शिरले पाणी

११४ घराची पडझड

फोटो - बगाजी सागर ०७ पी

धामणगाव रेल्वे : बगाजी सागर धरणात ९५ टक्के जलसाठा वाढल्यामुळे धरणाचे ३१ दरवाजे उघडण्यात आले़ वर्धा नदीला पूर आला असून, दोन दिवस पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे़ यादरम्यान दोन दिवसा पासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शिदोडी गावात पाणी शिरले, तर गव्हा फरकाडे येथील भिंत पडल्याने एक बकरी ठार झाली. ११४ घरांची पडझड झाली आहे.

अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील बगाजी सागर धरणाच्या जलसाठ्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील वाढ झाली आहे़ ९५.७७ टक्के जलसाठा या धरणात आहे. त्यामुळे बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे ४५ सेमीपर्यंत उघडून १३.०७ क्यूसेक पाण्याचा विर्सग मंगळवारी सकाळी १० पासून सुरू झाला आहे. त्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे़

वर्धा नदीकाठावरील वरूड बगाजी, चीचपूर, तुळजापूर, बऱ्हाणपूर , नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, गोकुळसरा, सोनोरा काकडे, आष्टा, झाडा, चिंचोली, विटाळा या गावातील गावकरी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नदीकाठावरील शेतकरी, मानवी वस्तीचे ठिकाणे, घरे, मछिमार नदीकाठावर रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन निम्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता पवन पांढरे व मंगरूळ दस्तगिर चे ठाणेदार सूरज तेलगोटे यांनी केले आहे.

शिदोडीत अर्ध्या गावात शिरले पाणी

शिदोडी या पुनर्वसन गावात गावातील नाल्याचे बांधकाम अर्धवट झाल्याने येथील चार हजार स्क्वेअर फूट असलेल्या घरात अर्ध्या रात्री पाणी शिरले त्यात हरिचंद्र शिवरकर, बंडू शेंडे, किसन मांढरे ज्ञानेश्वर शिवरकर, राजू कराळे, दिवाकर शेंडे रामचंद्र न्हाने यांच्या घरील धान्य कपडे तसेच जीवनाश्यक वस्तू ओल्या झाल्या आहे तालुक्यातील ११४ घरांची पडझड झाली आहे तर गव्हा फरकांडे येथील भिंत कोसळल्याने एक बकरीचा मृत्यू झाला. दोन हजार हेक्टर शेतात पाणी साचल्याने पिकाचे नुकसान झाले आहे.