शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

३० कोटींचा प्रकल्प जाणार १०० कोटींवर

By admin | Updated: December 6, 2015 00:12 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे सालोड येथील निम्न साखळी सिंचन प्रकल्पाची मूळ किंमत ३१ कोटी होती.

पाच वर्षांत जाणार पूर्णत्वास : १३ लाख रुपये एकरी मोबदलामनीष कहाते वाढोणा रामनाथनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे सालोड येथील निम्न साखळी सिंचन प्रकल्पाची मूळ किंमत ३१ कोटी होती. बुडीत क्षेत्रातील जमिनीचे भाव वाढल्याने प्रकल्प १०० कोटींच्या घरात जाणार आहे. वाढीव किंमतीचा फायदा जरी शेतकऱ्यांना होणार असला तरी किमान पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सूत्राने सांगितले. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील अर्जुनपूर, अमदापूर आणि हरणी अशा तीन गावांतील २८ शेतकऱ्यांच्या जमिनीवर काम करणार आहे. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनीची खरेदी जलसंपदा विभागाने सुमारे १२ ते १३ लाख रूपये एकराप्रमाणे केली आहे. जमिनीच्या वाढीव किमतीचा लाभ शेतकऱ्यांना झाला. मात्र दुसरीकडे सिंचन प्रकल्पाची किंमत तीनपट वाढली. दरवर्षी प्रकल्पाच्या बांधकामाकरिता २० कोटी रुपये शासनाकडून मिळणार आहेत. त्यामुळे प्रकल्प उभारण्याकरिता अधिक पाच वर्षे लागतील. म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीला प्रत्यक्ष पाणी देण्याकरिता अजून ५-६ वर्ष वाट पाहावी लागणार आहे. १८०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या निम्न साखळी प्रकल्पाची भिंत १९२० मीटर आहे. सध्या निधी कमी असल्याने प्रकल्पाच्या भिंतीकरिता जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. काही प्रमाणात कामही झाले. परंतु भिंतीच्या बांधकामाकरिता काळी माती उपलब्ध झाली नसल्याने गेल्या २-३ महिन्यांपासून प्रकल्पाचे काम रखडले आहे.