शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजारमध्ये शेतकऱ्यांना ३० कोटींचा फटका

By admin | Updated: July 24, 2014 23:38 IST

मंगळवारच्या अतिवृष्टीने चांदूरबाजार तालुक्याीतल सातही मंडळात संत्रा व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना ३० कोटींच्यावर आर्थिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुरेश सवळे - चांदूरबाजारमंगळवारच्या अतिवृष्टीने चांदूरबाजार तालुक्याीतल सातही मंडळात संत्रा व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. यात शेतकऱ्यांना ३० कोटींच्यावर आर्थिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नदी व नाल्या काठच्या सर्व शेतांमधील खरीप पिके खरडून गेली आहेत. तर बहुतांश संत्रा बागांमधील संत्र्यांची झाडेच उपटून गेली आहेत. संत्रा झाडावरील आंबिया संत्रा बहराची फूट हजारोंच्या संख्येत गळून पडली आहेत. काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने वाहून गेली आहेत. तालुक्यात ५८ हजार ५४० पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ४१हजार ३४२ हेक्टर जमिनीत ज्वारी ७३ हेक्टर, तूर ५५९९, सोयाबीन १८४८९, कापूस १६९१३ तर २६८ हेक्टर इतर पिकांची पेरणी झाली असून या बियाण्याला समाधानकारक अंकूर फुटले होते. तर संत्र्याच्या आंबिया बहराची फळधारणाही झाली होती. बुधवारी तालुक्यातील सर्व सातही मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व संत्रा उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे.जसापूर येथील कोरडे व टिंगणे यांच्यासह अनेक संत्रा उत्पादकांच्या बागेतील संत्रा झाडे उन्मळून पडली. तर जालनापूर येथील रमेश मेहरे यांच्या संत्रा बागेतील ११ झाडे उन्मळून पडली आहेत. काही शेतातील खरिपाची पेरणीच खरडून गेली आहे. काहींच्या शेतात अद्यापही तलाव साचले आहेत. नदीकाठच्या गावात शिरजगाव कसबा, देऊरवाडा, काजळी, ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली कोदोरी, थुगाव पिंप्री, टोंगलापूर, कुरळ, फुबगाव, सर्फापूर, हिरूर, धानोरा, राजना, तामसवाडी, तळणी, विरूळ, आसेगाव या शिवारातील शेतजमिनीत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. नाल्याकाठच्या गावात चांदूरबाजार, शिरजगाव बंड, आखतवाडा, बेलोरा, राजुरा, तळवेल, सोनोरी, जालनापूर, घाटलाडकी, गणोजा, करजगाव, तळेगाव मोहना, बेलज, जसापूर, बोरगाव मोहना, रामापूर, लाखनवाडी या शिवारातील शेतजमिनी खरडून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. गुरूवारीदेखील चांदूरबाजार २३.३९ मि.मी.पावसाची नोंद झाली असून एकूण पाऊस ३५८.२४ मि.मी. झाला आहे.