शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

५०० एकरांतील सोयाबीन जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:33 IST

नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देहिवरा मुरादे गावावर अस्मानी संकट : पावसाची दडी खरिपाच्या मुळावर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील हिवरा मुरादेसह पंचक्रोशीतील सुमारे ५०० एकर क्षेत्रावरील सोयाबीन पीक पावसाअभावी जळाले आहे. सलग चौथ्यावर्षी ही परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह तातडीने सर्वेक्षणाची मागणी केली आहे.हिवरा मुरादे या गावातील शेतकऱ्यांनी पावसाला सुरूवात होताच जवळपास ५०० एकरांत सोयाबीनची पेरणी केली. पीकही जमीनीबाहेर आले. मात्र, २५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन पीक जळून नष्ट झाले. आता पाऊस आला तरीही पिकाला काहीच फायदा नाही. हिवरा मुरादे, वडाळा, फत्तेपूर, पिंपळगाव निपाणी, बोरगाव, पुसनेर, टाकळी कानडा, टाकळी गिलबा आणि पिंपळगाव या गावांतही पिकांची स्थिती भयावह आहे. त्याअनुषंगाने हिवरा मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री अनिल बोंडे व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भेटून सोयाबीन पिकांची वास्तविकत: विशद केली. परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून आर्थिक मदत देण्याबाबत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.यावेळी सरपंच सुषमा मुरादे, उपसरपंच रमाकांत मुरादे, रवींद्र मुरादे, प्रमोद मुरादे, अजय मुरादे, अमोल जाधव, साहेबराव मोडक, गणेश डवले, राहुल डांगे, महादेव गायकवाड, प्रशांत मुरादे, तुळशिदास पाडर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.पशुधनाचेही हालपाऊस नसल्याने एकीकडे सोयाबीन पिके जळून नष्ट झाली आहेत. दुसरीकडे पशुधनाला चारा व पाणी नसल्याने पशुधन कसे पाळावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधनाला चारा व पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हिवरा-मुरादे येथील शेतकºयांनी कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यासोबतच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्याबाबत लक्ष वेधले. यावर योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शेतकºयांना दिले.हिवरा- मुरादे या गावासह परिसरातील शिवारात पाऊसच नसल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक जळून नष्ट झाले आहे. आता पाऊस आला तरी काही उपयोग नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शासनाने नुकसान भरपाई देऊन तातडीची आर्थिक मदत केल्यास दुसºया पिकासाठी तडजोड तरी करता येईल.- रवींद्र मुरादे, शेतकरी, हिवरा मुरादे

टॅग्स :agricultureशेती