शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या नैसर्गिक आपत्ती नुकसानीसाठी २९ कोटींची मदत

By admin | Updated: September 25, 2016 00:28 IST

यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील ३४ हजार ९२५ शेतकऱ्यांच्या १८ हजार ६५४ हेक्टर शेतामधील पिके बाधित झाली

फेब्रुवारी-मार्चमधील गारपीट : ३४,९२५ शेतकऱ्यांना लाभ अमरावती : यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील ३४ हजार ९२५ शेतकऱ्यांच्या १८ हजार ६५४ हेक्टर शेतामधील पिके बाधित झाली. या सर्व एनडीआरएफच्या नव्या निकषाप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने २९ कोटी ९ लाख ५२ हजाराचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यात यंदा फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे गहू, हरभरा व संत्रा पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाद्वारा सर्वेक्षण करण्यात आले. मात्र शासनाने बाधित शेतकऱ्यांना भरपाई न दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता शासनाने २० सप्टेंबर रोजी राज्यासाठी ८७ कोटी ५८ लाख ९१ हजाराचा निधी मंजूर केला. यामध्ये जिल्ह्याच्या वाट्याला २९ कोटी ९ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रचलित नियमानुसार नुकसानीकरिता मदत ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांसाठी राहणार आहे. या बाधित क्षेत्राच्या पंचनाम्यासोबत पिकांचे छायाचित्र आवश्यक आहे. व या शासन मदतीची रकम शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करतांना कोणतीही थकीत वसुली बॅँकांनी करु नये, असे निर्देश देण्यात आले आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी ही मदत ६८०० रुपये प्रति हेक्टर आणि आश्वासित सिंचन योजनेखालील पिंकासाठी १३००० रुपये प्रतिहेक्टर अशी राहणार आहे. तसेच बहुवार्षिक पिकांसाठी १८,००० रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे मदत मिळणार आहे. शासनाने याबाबत जीआर काढला आहे. (प्रतिनिधी)