महसुलात वाढ : वाळू साठ्यांवर धाडसत्र सुरुचअमरावती: शहरात बेकायदा वाळू साठे बाजांवर धाडसत्र सुरुच असून आतापर्यंत २९ वाळू साठे लिलावातून २८ लाखांचा महसूल मिळाला आहे. उर्वरित ३० वाळू साठ्यांचे लिलाव लवकरच केले जातील, असे संकेत आहे.वाळूची साठेबाजी करुन ती चढ्या दरात विकण्याच्या फंडा वाळू व्यावसायीकांचा आहे. मात्र वाळूची साठेबाजी करता येत नसताना शहरात जागोजागी वाळू साठे असल्याप्रकरणी महसूल विभागाने गत महिन्याभरापासून धाडसत्र मोहिम राबविली आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात असलेले सुमारे ६० वाळू साठे जप्त करुन या वाळू साठ्यांची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे.आतापर्यत २९ वाळू साठ्यांची लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. उर्वरित ३० वाळू साठ्यांचे लिलाव वरिष्ठांच्या आदेशानुसार केले जाणार आहे. मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडलेल्या वाळू साठ्यांच्या लिलावात तीन वाळू साठ्यांच्या लिलावातून आठ लाख रुपये तिजोरीत जमा झाले आहे. वाळू साठ्यातून महसूल वाढीस प्राधान्य मिळाले असून साठेबाजांवर अंकुश लावण्यात काही अंशी यश मिळाले आहे. ही कारवाई निरंतरपणे सुरु राहणार आहे. अवैध वाळू साठे जप्त करुन या वाळू साठ्यांची लिलाव प्रक्रिया राबवून महसूल वाढीसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहे.या वाळू साठ्यांचे करण्यात आले लिलावयेथील तहसील कार्यालयात मंगळवारी ३४ वाळू साठ्यांचे लिलाव प्रक्रिया पार पडली. यात वलगाव येथील वाळू लिलावातून ३ लाख ६० हजार, अकोली ३२ हजार तर तपोवन येथील जप्त वाळू लिलावातून ४ लाख १० हजार रुपये महसूल जमा झाला आहे.वाळू साठे लिलाव प्रक्रिया निरंतरपणे सुरु राहील. अवैध वाळू साठ्यांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे. महसूल वाढीसाठी हा प्रयोेग अतीशय लाभदायक ठरला आहे.सुरेश बगळेतहसीलदार, अमरावती.
वाळू लिलावातून मिळाले २८ लाख
By admin | Updated: October 22, 2015 00:17 IST