शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत ६७ कर्मचाऱ्यांकडून २७.३५ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:18 IST

अमरावती : महापालिकेत पाचव्या, सहाव्या वेतन आयोगापासून ६७ कर्मचाऱ्यांना अतिप्रदान करण्यात आलेले २७ लाख ३५ हजार रूपयांची रक्कम वसुल ...

अमरावती : महापालिकेत पाचव्या, सहाव्या वेतन आयोगापासून ६७ कर्मचाऱ्यांना अतिप्रदान करण्यात आलेले २७ लाख ३५ हजार रूपयांची रक्कम वसुल करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासनाच्या धडाकेबाज कार्यवाहीने कर्मचारी हैराण झाले आहे. जानेवारी २०२१ पासून वेतन कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेचा आर्थिक डोलारा ढासळला असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिप्रदान वेतन उचल केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली होती. लेखा आक्षेपानंतर ही बाब पुढे आल्याने लेखा विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अतिप्रदान वेतन घेणाऱ्यांपैकी काही अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्तदेखील झाले आहे. असे असले तर जानेवारी २०२१ पासून अतिप्रदान वेतनाची रक्कम वसूल करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेतला आहे. याप्रकरणी आयुक्त प्रशांत रोडे यांनी लक्ष दिल्यामुळे ६७ कर्मचाऱ्यांकडून २७ लाख ३४ हजार ९१६ रुपए महापालिका तिजोरीत जमा होणार आहे.

-------------------

‘बाबुगिरी’चे फिक्सिंग

सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन निश्चितीबाबत वरिष्ठांकडे टिपणी पाठविताना ‘बाबुगिरी‘कडून फिक्सिंग करण्यात येत असल्याची शंका बळावली आहे. मर्जीतील अधिकारी, कर्मचारी यांचे वेतनाची रक्कम ठरविताना टिपणीत घुसखोरी करुन त्यावर आयुक्त, उपायुक्तांनी स्वाक्षरी घेऊन तसा प्रवास केला जातो. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या दुर्लक्षानेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिप्रदान वेतन देण्यात आल्याचे वास्तव आहे.