शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अन् विशेष परवानगी घेऊन २५० किलोची औषधी नेपाळला रवाना

By admin | Updated: April 29, 2015 00:15 IST

नेपाळमधील भुकंपपीडितांना वैद्यकीय मदतीसाठी २५० किलोचा औषधीसाठा नेण्यासाठी नागपूर एअरपोर्ट प्रशासनाने परवानगी दिली नव्हती.

मदतकार्य सुरू : लवकरच दुसरे वैद्यकीय पथक जाणारअमरावती : नेपाळमधील भुकंपपीडितांना वैद्यकीय मदतीसाठी २५० किलोचा औषधीसाठा नेण्यासाठी नागपूर एअरपोर्ट प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. मात्र, दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाकडून सूचना मिळाल्यावर विमानातून अखेर औषधीसाठा नेण्याची परवानगी देण्यात आली. या साठ्यासह अमरावती विभागातील सात जणांचे पथक सोमवारी रात्री नेपाळला रवाना झाले आहे. नेपाळ येथील भूकंपग्रस्तांना देशभरातून मदतीचा ओघ सुरू असताना अमरावती विभागाच्या आरोग्य खात्यानेही वैद्यकीय सेवेसाठी मदतीचा हात दिला. सोमवारी अकोला आरोग्य येथील उपसंचालक कार्यालयामार्फत २५० किलो वजनाचे वैद्यकीय साहित्य व सात जणांचे पथक नेपाळकरिता रवाना होणार होते. रात्री ७.४५ वाजता नागपूर येथील इंडिगो एअरलाईनचे विमान (ई-२०२) दिल्लीकडे रवाना होणार होते. त्यामध्ये वैद्यकीय साहित्य नेण्यासाठी आरोग्य विभागाने विमानतळ प्रशासनाला रीतसर पत्रही दिले होते. मात्र, २५० किलोचे वैद्यकीय साहित्य विमानातून नेता येणार नाही. प्रतिकिलो २५० रुपये शुल्क अदा करावे लागेल, अशा सूचना विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्यामुळे अमरावतीच्या पथकाची ताराबंळ उडाली. ही बाब त्यांनी आरोग्य उपसंचालक अविनाश लव्हाळे यांना कळविली. त्यांनी तत्काळ वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दिल्ली येथे भुकंपपीडितांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सदनातील कक्षाला संपर्क केला. सदनातील अधिकाऱ्यांनी विमानतळ प्रशासनाशी संपर्क करून परवानगी घेतली. आणि अखेर चमू व साहित्य रवाना झाले. हे पथक काठमांडुत मदतीसाठी पोहचले. नॅशनल डिझॉस्टर रिलीफ फोर्सच्या माध्यमातून अमरावतीची पथके भुकंपपीडिताना मदत करीत आहेत. अमरावतीचे पथक काठमांडू पोहोचलेअमरावती विभागातील सात जणांचे पथक वैद्यकीय साहित्य घेऊन रात्री १०.२० वाजता विमानाने दिल्ली पोहचले. तेथील महाराष्ट्र सदनात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तेथील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अमरावतीचे पथक मिल्ट्रीच्या विमानाने नेपाळ येथील काठमांडूत पोहचले आहे. आॅक्सिजन सिंलिडरची परवानगी नाकारलीभुकंपपीडितांसाठी अमरावती विभागामार्फत आॅक्सिनजचे सिलिंडर नेण्यात आले होते. मात्र, एअरपोर्ट प्रशासनाने आॅक्सिजन नेण्यास परवानगी दिली नाही. दुसरेही पथक सज्जभुकंपपीडितांच्या मदतीसाठी एक पथक रवाना झाले. त्या पथकाने मदतकार्य सुरु केले. त्यांचे साहित्य संपल्यावर पुन्हा दुसरे पथक अमरावतीवरून रवाना होणार आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत दुसरे पथक सज्ज करण्यात आले आहे. आम्ही २५० किलो वजनाचे वैद्यकीय साहित्य जुळविले. नियामानुसार ते विमानातून वाहून नेता येत नव्हते. दिल्लीशी संपर्क करून ती समस्या सोडविली. पथक नेपाळमध्ये सेवा देत आहे. डॉ.अविनाश लव्हाळे, आरोग्य उपसंचालक.