शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

२५० घनमीटर अवैध लाकूड तरीही आरागिरणी सील का नाही?

By admin | Updated: September 25, 2016 00:23 IST

स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवरलाईननजीकच्या नवदुर्गा सॉ मिलमध्ये रविवारी १८ सप्टेंबर रोजी ८ ते १० ट्रक लाकूड आढळल्याप्रकरणी चौकशी आरंभली आहे.

अमरावती : स्थानिक वलगाव मार्गावरील टॉवरलाईननजीकच्या नवदुर्गा सॉ मिलमध्ये रविवारी १८ सप्टेंबर रोजी ८ ते १० ट्रक लाकूड आढळल्याप्रकरणी चौकशी आरंभली आहे. मात्र सहा दिवसांचा कालावधी लोटला असताना २५० घनमीटर अवैध लाकूडप्रकरणी सॉ मिल सील का करण्यात आले नाही? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.सहा दिवसांपूर्वी नवदुर्गा आरागिरणीवर अवैध लाकूड आढळले. परंतु लाकूड तपासणीच्या नावे वेळकाढू धोरण आखले जात असल्याचे चित्र आहे. या आरागिरणीत २५० घनमीटर अवैध लाकूड असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. नवदुर्गा सॉ मिल मालकांनी सदर लाकूड हे जिल्हा स्त्री रुग्णालयातून आणल्याचा दावा केला आहे. तसे सहा महिन्यांपूर्वी वृक्षतोड परवानगीचे आदेशही वनविभागाला सादर केल्याची माहिती आहे.मात्र शहरातून वृक्षतोड केल्यानंतर आरागिरणीत लाकूड आणण्यापूर्वी वृक्षाची वर्गवारी वनविभागास का सादर करण्यात आली नाही, हा खरा प्रश्न निर्माण होत आहे. मार्च महिन्यात डफरीनमध्ये वृक्षतोड करण्यात आली, तर सहा महिन्यांनंतर आरागिरणीत लाकूड आले कसे? याचा शोध आरागिरणी वनपालांनी का घेतला नाही, याचे वरिष्ठांनी चिंतन करावे, असे बोलले जात आहे.लाकडाचे मोजदाद करण्यासाठी सहा दिवस लागत असेल तर या सहा दिवसांमध्ये आरागिरणीत किती अवैध लाकूड फस्त झाले हे वनकर्मचाऱ्यांना देखील चांगल्या तऱ्हेने माहीत आहे. स्थानिक इतवारा बाजारात काही महिन्यांपूर्वी गुरुकृपा आरागिरणीत एक क्विंटल अवैध लाकूड आढळले असताना चार महिन्यांपर्यंत सॉ मिल सील करण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र नवुदर्गा सॉ मिलवर २५० घनमीटर अवैध लाकूड आढळले असताना केवळ लाकूड तपासणीचा फार्स रचून आरागिरणी मालकाला अभय दिले जात असल्याचे वास्तव आहे. (प्रतिनिधी)