शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

२५ प्रभाग इतिहासजमा, चार प्रभागांचे नामकरण

By admin | Updated: October 9, 2016 01:02 IST

फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत आणि प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर...

सार्वत्रिक निवडणूक : २२ प्रभागांतून ८७ नगरसेवकअमरावती : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत आणि प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर २५ प्रभाग इतिहासजमा झाले आहेत. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ४३ पैकी २२ प्रभागांतून ८७ नगरसेवक निवडून येणार आहेत. ही निवडणूक चार सदस्यीय प्रणालीने होत असल्याने विद्यमान २५ प्रभाग इतिहासजमा झाले आहेत. पीडीएमसी, जोग स्टेडियम, जुनीवस्ती बडनेरा व नवीवस्ती बडनेरा हे प्रभाग नव्याने अस्तित्वात आले आहेत. ७ आॅक्टोबरला टाऊन हॉलमध्ये २२ प्रभागांची रचना आणि आरक्षण सोडत काढण्यात आली. २०१२ ची निवडणूक ४३ प्रभागांमध्ये घेण्यात आली होती. आगामी निवडणुकीत २१ प्रभागातून प्रत्येकी ४ आणि एसआरपीएफ या प्रभागातून ३ सदस्य निवडून येतील. सन २०१२ मध्ये स्वतंत्र असलेले विलासनगर व मोरबाग या दोन प्रभागांचा संयुक्त एक प्रभाग झाला आहे. याशिवाय काँग्रेसनगर-फ्रेजरपुरा या जुन्या प्रभागाचे नाव बदलून फ्रेजरपुरा हा स्वतंत्र प्रभाग बनला आहे. गवळीपुरा या जुन्या प्रभागाला नव्या प्रभागरचनेत छायानगर-गवळीपुरा असे करण्यात आले आहे. ४३ प्रभागांचे रुपांतर २२ प्रभागांमध्ये करण्यात आल्याने सर्वच प्रभागांच्या सीमारेषा विस्तारल्या आहेत. प्रभागाची लोकसंख्या प्रत्येकी २६ हजार ते ३२ हजारांच्या घरात आहे. यात बेनोडा, जुनीवस्ती बडनेरा, छायानगर-गवळीपुरा, अलिमनगर, बेनोडा, जमील कॉलनी, गडगडेश्वर, सुतगिरणी हे प्रभाग लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक मोठे आहेत. याशिवाय चार सदस्यीय प्रभागात जोग स्टेडियम हा सर्वात लहान प्रभाग आहे. २०११ च्या ६,४७,०५७ या लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने २२ प्रभाग करण्यात आले आहेत. ओबीसीसाठी २३, अनुसूचित जातीसाठी १५ आणि अनुसूचित जमातीसाठी ०२ जागा राखीव आहेत. नव्याने बनलेले प्रभागपीडीएमसी, जोग स्टेडियम, जुनीवस्ती बडनेरा, नवी वस्ती बडनेरा.संयुक्त झालेले प्रभागशेगाव-रहाटगाव, विलासनगर- मोरबाग, छायानगर-गवळीपुरागुडूप झालेले प्रभागतपोवन, संत गाडगेबाबा, रामपुरी कॅम्प, विदर्भ महाविद्यालय, मालटेकडी, वडाळी, चपराशीपुरा, स्वामी विवेकानंद, अंबिकानगर, शारदानगर, गौरक्षण, जवाहर गेट, पठानपुरा, मेहंदिया कॉलनी, रहमतनगर, नवाथे, दस्तुरनगर, किरणनगर, वडरपुरा, नेमाणी गोडावून, अलमासनगर, बारीपुरा, सोमवारबाजार, झिरी, जेवडनगर.