शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत!

By admin | Updated: July 21, 2014 23:37 IST

पालकमंत्री म्हणाले की, संत्रा उत्पादकांना झालेल्या या नुकसानीविषयी विशेष पॅकेज देण्याच्या सूचना फलोत्पादन विभाग तसेच संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. अहवालाअंती निर्णय घेण्यात येईल.

अमरावती : पालकमंत्री म्हणाले की, संत्रा उत्पादकांना झालेल्या या नुकसानीविषयी विशेष पॅकेज देण्याच्या सूचना फलोत्पादन विभाग तसेच संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. अहवालाअंती निर्णय घेण्यात येईल. आजच्या या बैठकीत शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी याविषयी ठराव घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अमरावती व नागपूर विभागात गत दोन वर्षापासून हवामानावर आधारीत पीक विमा योजना व राष्ट्रीय पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विम्याचा आर्थिक आधार असतो. परंतु प्रसिद्धीअभावी या योजनांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अमरावती व नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच या दोन्ही विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना देखील नोटीस देण्यात आल्या आहेत. प्रतिसाद का लाभला नाही याविषयी अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल तसेच प्रसंगी निलंबनाची कारवाई केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा ट्रिगर हा पावसावर आधारित होता. या योजनेची मुदत ३० जून २०१४ संपली. मात्र फार थोड्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. परंतु सर्वच शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ३ जुलै रोजी राष्ट्रीय पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची मुदत ३१ जुलै रोजी संपत आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग असावा यासाठी ‘स्पेशल ड्राईव्ह’द्वारे शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे योजना पोहचविण्याची जबाबदारी कृषी अधिकारी व आत्मा यांच्यावर सोपविण्यात आली असून कृषी पीक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे पीक उगवलेच नसल्याच्या तक्रारी सोमवारच्या जिल्हा आढावा बैठकीत समोर आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यात येईल व त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येणार असून संबंधित बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, उस्मानाबाद जिल्ह्यात नित्कृष्ट बियाण्यांमुळे पीक उगवलेच नाही. अश्या तक्रारी आल्या असता त्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. खंडित पावसामुळे खरीप पिकांची स्थिती गंभीर आहे. पीक पेरणी उशिराने होत आहे. कालावधी पुरेसा राहत नसल्याने यंदा सरासरी उत्पन्नात घट होणार आहे, हे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आहे. राज्याच्या खरीप हंगामाच्या स्थितीची आपण माहिती घेत आहोत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर नाही. प्रकल्पामध्ये वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा आहे, जिल्ह्यात मागील वर्षी धारणी तालुक्यात १० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. यावर्षी याच तालुक्यात ८ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शासनाने तहसीलदारांना आता टँकर सुरू करण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी ट्रॅक्टर भाडे, डिझेल आदी समस्या येत असल्याने खासगी टँकर मिळत नव्हते आता हा प्रश्न मिटला आहे. तालुकास्तरावर निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहे. तात्पूरत्या पाणी पुरवठा योजना तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनांच्या तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी स्तरावरून याविषयी सूचना देण्यात येऊन निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पिकाची स्थिती गंभीर आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पेरणी उशीरा सुरू होत आहे. सद्यस्थितीत केवळ २२ टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षी यावेळेस ७० टक्के पेरणी झाली होती. पावसाचे प्रमाण कमी असल्याने उत्पादनदेखील कमी होणार आहे. राज्यात सरासरी २५ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पेरणीच्या सरासरीमध्ये तफावत आहे. यावर्षी दुबार पेरणीचे फारसे संकट नाही. बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. सोयाबीन हे मागील वर्षीच्या हंगामात खराब झाल्याने उगवणशक्ती कमी आहे. बियाणे महामंडळाचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत. राज्यात १३५ लाख हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी होते. यापैकी १०५ हेक्टरमध्ये कपाशी सोयाबीनची पेरणी होते. पावसाअभावी शोचनीय स्थिती आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)