शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय विभागांची २५ टक्के मालवाहतूक होणार एसटीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST

अमरावती : गत वर्षापासून संपूर्ण राज्यात कोरोना संकट घोंगावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून राज्यात कठोर निर्बध लागू करण्यात ...

अमरावती : गत वर्षापासून संपूर्ण राज्यात कोरोना संकट घोंगावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून राज्यात कठोर निर्बध लागू करण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात बसला आहे. एसटी महामंडळाला उभारी देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून शासनाच्या विविध विभागामार्फत होणाऱ्या खासगी मालवाहतुकीच्या २५ टक्के मालवाहतुकीचे काम एसटी महामंडळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे एसटी महामंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषत: लॉकडाऊनमध्ये एसटीच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. अनलॉक नंतर काही प्रमाणात एसटीची गाडी पुन्हा रुळावर येत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा एसटीची प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आंतरराज्य तसेच आंतर जिल्हा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोरोना संकटामुळे लोकांचा प्रवास कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम एसटी महामंडळा झाला आहे. उत्पन्न घटल्याने कर्मचार्‍यांचे वेतनासाठी सुद्धा एसटी प्रशासन व राज्य शासनाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला ही समिती मंत्रिमंडळाचे निर्णय अंमलबजावणी तसेच महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम करणार आहे.

बॉक्स

इतर शासकीय वाहनांची दुरुस्ती होणार

राज्यात एसटी महामंडळाचे ९ टायर्स पुन:स्तरण सयंत्र कार्यरत आहेत. त्याव्दारे शासकीय उपक्रमांमध्ये वापरली जाणारी ५० टक्के अवजड वाहने आणि प्रवासी वाहने यांच्या टायरचे पुन:स्तरण करण्यात येणार आहे. महामंडळाचे विभागीय कार्यशाळेत अवजड आणि प्रवासी शासकीय वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती होणार आहे.