शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते विकासाकरिता २५ कोटी रुपये मंजूर

By admin | Updated: July 30, 2016 23:59 IST

शहरातील रस्ते विकासाकरिता शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

देशमुख यांचा पाठपुरावा : अर्थमंत्र्यांकडून हिरवी झेंडीअमरावती : शहरातील रस्ते विकासाकरिता शासनाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आ.सुनील देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने हा निधी मंजूर केल्याचे पत्र अर्थमंत्र्यांनी दिले आहे. यात शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण होईल. पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये हा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २१ जुलै रोजी आ. देशमुख यांना पत्र लिहून ही बाब कळवली आहे. तसेच भविष्यात सुद्धा आ. सुनील देशमुख यांच्या विकासासंबंधित योग्य सूचनांचे सदैव स्वागत करण्यात येईल, असेही आश्वासन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केले आहे. शहराच्या रस्त्यांच्या व वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या एकात्मिक रस्ते विकास योजनेची मुहूर्तमेढ आ.देशमुख यांनी केली होती. त्यातून या शहरातील अंतर्गत रस्ते रुंद व मजबूत करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील रस्त्यांकडे पाहिजे त्या स्वरुपात लक्ष न दिल्यामुळे तसेच निधीच्या कमतरतेमुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शहरातील काही मुख्य रस्त्यांच्या कायमस्वरुपी सुधारणेच्या दृष्टिकोनातून आ. देशमुख यांनी केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत काँक्रीट रस्ते निर्मितीसाठी अमरावती शहरांतर्गत ४८५ कोटी रुपये निधी मंजूर करवून घेतला. त्यामध्ये शहरातील जुन्या व नवीन महामार्गाचा समावेश आहे. महापालिकेच्या अखत्यारितील मुख्य रस्त्यांच्या विकासासाठी निधीच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आ. देशमुख यांनी सातत्याने पाठपुरवठा केला होता. त्याच्या प्रयत्नांना यश येवून अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांमध्ये शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी २५ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आली असून त्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून प्रमुख मार्गांचे काँक्रीटीकरण होणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.