शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

वर्षभरात २३ जणांना मिळाली दृष्टी

By admin | Updated: June 10, 2015 00:17 IST

नेत्रदान ही काळाची गरज असून अमरावती जिल्हा नेत्रदानात अग्रेसर आहे.

शस्त्रक्रियेत अग्रेसर : २५ हजार अंधत्व प्रमाणपत्र वितरणइंदल चव्हाण/वसंत कुळकर्णी अमरावतीनेत्रदान ही काळाची गरज असून अमरावती जिल्हा नेत्रदानात अग्रेसर आहे. वर्षभरात १२८ नेत्र बुब्बुळे गोळा करण्यात आले असून त्यापैकी २३ जणांना नेत्रप्रत्योरापणातून नेत्रदृष्टी मिळाली आहे. नेत्रपेढीकडून आजपर्यंत २५ हजार रुग्णांना प्रमाणपत्र वितरित केले आहेत. आज जागतिक दृष्टीदिनानिमित्त सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करण्याची काळाची गरज आहे. मानवी शरीरासाठी नेत्र हा अति महत्त्वाचा अवयव आहे. मात्र, नेत्र नसणाऱ्यांच नेत्राचे महत्त्व कळते. त्यामुळे दृष्टीहिनांना नेत्रदान करुन नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रपेढीला २०१४-१५ मध्ये ५ हजार २५० मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्टे मिळाले होते. त्यामध्ये त्यांनी ५ हजार ६०९ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. तसेच नेत्र बुब्बुळे गोळा करण्यासाठी १०० रुग्णांचे उद्दिष्टे मिळाले असता त्यांनी १२८ मृतांचे डोळे काढून २३ जणांना दृष्टी दिली आहे. त्यामुळे २३ जणांना जग पाहण्याचे सौभाग्य लाभले आहे. या उपक्रमातून सर्वाधिक नेत्रदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यामुळे इर्विनच्या नेत्रपेढीचा महाराष्टातून प्रथम क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. १० जून हा जागतिक नेत्रदान दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनांनी केलेल्या सर्व्हेनुसार जगात २८५ दशलक्ष लोक दृष्टीहीन आहेत. त्यापैकी ३९ दशलक्ष लोक हे कायमचे अंध आहेत. २४६ दशलक्ष लोकांची दृष्टी कमी आहे. जागतिक पातळीवर अंधत्वाचे प्रमाण - ५८ टक्के अंधत्व ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक, ३५ टक्के लोक हे ४५ - ५९ या वयोगटातील आहेत. ७ टक्के १५-४४ या वयोगटातील आहेत. ४ टक्के अंधत्व हे ४ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहे. सद्याच्या अंदाजानूसार २०२० पर्यंत कायम अंध लोकांची संख्या ७५.३९ दशलक्ष तर २००.३९ दशलक्ष ही दृष्टी कमी असलेल्या लोकांची संख्या असेल, असा अंदाज मांडण्यात आला आहे.नेत्रदान म्हणजे काय व ते केव्हा केले जाऊ शकते?मृत्यूनंतर डोळ्यांचे दान केले जाऊ शकते. नेत्रदानामध्ये फक्त कोर्नेआ काढला जातो व त्या कोर्नेआच प्रत्यारोपण गरजू लोकांना केला जातो.नेत्रदान कोण करू शकते?कुठल्याही वयाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. नंबरचा चष्मा वापरणारे किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले व्यक्ती, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर आजार असलेले व्यक्तीदेखील नेत्रदान करू शकतात.नेत्रादानासाठी अशीघावयाची काळजी मृत्यूनंतर सहा तासांपर्यंत नेत्रदान केले जाऊ शकतात. त्यामुळे मृत्यूनंतर ताबडतोब नेत्रपेढीशी संपर्क करणे गरजेचे आहे. मृत व्यक्तीचे डोळे उघडे असल्यास ते बंद करावे व त्यावर ओले कापसाचे बोळे ठेवावे. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली २ उशा ठेवाव्यात. पंखा बंद ठेवावा. ए.सी असेल तर सुरु ठेवू शकता.अंधत्वाची कारणे :अंधत्वाची मुख्य कारणामध्ये मोतिया बिंदू (४७.८%), काचबिंदू (१२.३%), वयानुसार दृष्टी कमी होणे (८.७%), कोर्नेआ अंधुक आदींचे प्रमाण कमी होतात. अंधत्वाला मोतीयाबिंदू हा प्रमुख कारण आहे. अंधत्वाचा. जगात १७.६ दशलक्ष लोकांना मोतियाबिंदूमुळे अंधत्व आलेला आहे. अमरावतीमध्ये नेत्रपेढी कुठे आहेत?अमरावतीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेत्रपेढी आहे. दिशा ग्रुप या धर्मदाय संस्थेद्वारा संचालित दिशा आय बँक अमरावतीमध्ये २ वर्षांपासून कार्यरत आहेत. कोणाला नेत्र हवे असल्यास काय करावे?दिशा आय बँक या ठिकाणी प्रतीक्षा यादी उपलब्ध आहे. अंध व्यक्तीची चाचणी करून त्याचे नाव प्रतीक्षा यादीत टाकले जाते. जसे जसे डोळे दान केले जातात तसे त्यांचे वाटप केले जाते. कोर्नेअल प्रत्यारोपणचा खर्च जवळपास ५००० रुपये येतो.नेत्रदानात अमरावती शहर अव्वल असून इर्विनमधील नेत्रपेढीकडून नेत्रदानासंदर्भात सातत्याने जनजागृती कार्यक्रम राबविले जाते. नागरिकांनी नेत्रदानात पुढाकार घेऊन अंधाच्या जीवनात प्रकाश टाकणे गरजेचे आहे. - अरुण राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक. जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीमध्ये कार्यरत अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमाने व सहकार्याने नेत्रदान व मोतीबिंदू नेत्रशस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हा नेत्रदानात अग्रेसर आहे. - राजेश जवादे, नेत्र शल्यचिकित्सक.