शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

२० पोलिसांची प्रकृती बिघडली

By admin | Updated: September 4, 2014 23:27 IST

दूषित पाणी पिण्यात आल्याने प्रशिक्षणार्थी २० पोलिसांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती जिल्हा पोलीस

दूषित पाण्याचा प्रभाव : पोलीस अधीक्षकांची माहितीअमरावती : दूषित पाणी पिण्यात आल्याने प्रशिक्षणार्थी २० पोलिसांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभू यांना मिळताच त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांकडून आढावा घेतला. नुकत्याच घेण्यात आलेल्या अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस भरतीत २२८ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. नव्याने रुजू झालेल्या या पोलिसांना पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देणे सुरु आहे. बुधवारी या कर्मचाऱ्यांना नळाचे पाणी मिळाले नसल्याने त्यांना बोअरचे पाणी प्यावे लागले. यातील काही कर्मचाऱ्यांना याची बाधा झाली. त्यामुळे दूषित पाणी पिण्यात आल्याने यातील वीस पोलिसांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडली. त्यांना उलटी, संडास होणे सुरु झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दूषित पाणी पिण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली असल्याचे निदान डॉक्टरांनी सांगितले. यातील दोन महिला कर्मचाऱ्यांना टायफाईड व एका कर्मचाऱ्याला गॅस्ट्रो झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एस.वीरेश प्रभू यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.