शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

१० वर्षांपासून रखडले १८ प्रकल्प

By admin | Updated: May 3, 2015 00:27 IST

ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमीचा अमरावती जिल्हा आता औद्योगिक प्रगतीचे बाळसे धरु लागला आहे.

अपेक्षा : दोन महिन्यांत येणार डझनावर वस्त्रोद्योग कारखानेअमरावती : ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमीचा अमरावती जिल्हा आता औद्योगिक प्रगतीचे बाळसे धरु लागला आहे. येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत पुढील दोन महिन्यांत १२ ते १५ वस्त्रोद्योग, कारखाने सुरू होणार असल्याची शुभवार्ता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आठवडाभरापूर्वीच दिली. हजारो बेरोजगारांना यातून काम मिळणार आहे. आता जिल्ह्यात २००४ पासून विविध कारणांनी रखडलेले १८ जलसिंचन प्रकल्पदेखील तातडीने मार्गी लागावेत, अशी महाराष्ट्रदिनी नागरिकांची माफक अपेक्षा आहे. जिल्ह्यात निम्न्पेढी प्रकल्प (२००४), बोर्डीनाला, पेढी बॅरेज, घुंगसी बॅरेज, निम्न चारघड, चांदी नदी, नागठाणा-२, चांदसुरा, टिमटाला, भिमडी, राणपिसा , पवनी, शिवणगाव, बहादा, आमपाटी, पाटीया, डोमा, झटामझिरी असे २८ प्रकल्प सन २००४ पासून विविध कारणांनी रखडले आहेत. दरवर्षी या प्रकल्पांच्या किमती वाढत आहेत. हे प्रकल्प मार्गी लागल्यास जिल्ह्यातील ४० टक्के क्षेत्र सिंचनाखाली येऊन जिल्हा खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् होऊ शकतो. जिल्ह्यात ३७४ नोंदणीकृत लहान मोठे कारखाने आहेत. यामध्ये १३ लाख ७६ हजार कामगार आहेत. पाणी, विजेची उपलब्धता, मुबलक मनुष्यबळ व अत्यंत सोईचा राष्ट्रीय महामार्ग यामुळे अलीकडच्या काळात अनेक उद्योगांकडून जिल्ह्याला पसंती मिळत आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यात मोठ्या कारखान्याचा शिलान्यास होत असून लवकरच १२ ते १५ वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखाने सुरू होत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्यानंतर सन १९६२ मध्ये पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष सुदेश बोके व त्यानंतरचे वि.अ. शिसोदे या महाभागांनी ग्रामविकासाचा पाया रचला. गावागावांत विकासाच्या पायाभूत सुविधांची मुहूर्तमेढ रोवली. यामुळे दुर्गम भागांशी संपर्क प्रस्थापित होऊन आदिवासींना प्रवाहात आणणे शक्य झाले. आजही कुपोषणाची समस्या आहेच.यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होत आहेत. (प्रतिनिधी)सहकाराला मिळावे गतवैभवजिल्ह्यात सहकाराच्या नोंदणीकृत ११४ मोठ्या संस्था आहेत. परंतु या संस्थांची आजची स्थिती तितकीशी समाधानकारक नाही. याला सहकारनेते जेवढे जबाबदार तेवढेच शासनाची धोरणेही कारणीभूत आहेत. कापूस विक्रीसाठी खुला केल्याबरोबर जिल्ह्यातील बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, जिनिंग- प्रेसिंग, सहकारी संस्था मोडकळीस आल्यात. संस्थांची मालमत्ता विकून कर्मचाऱ्यांचे पगार करावे लागत आहेत. विकासाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.