शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाच्या रकमेत १५ टक्क्यांनी वाढ

By admin | Updated: October 8, 2016 00:08 IST

पुढील वर्षीच्या खरीप व रबी हंगामात पीककर्जाच्या रकमेत सरासरी १५ टक्के वाढ करण्यात येणार आहे.

दिलासा : राज्य समितीचे दर जिल्हा समितीला बंधनकारकअमरावती : पुढील वर्षीच्या खरीप व रबी हंगामात पीककर्जाच्या रकमेत सरासरी १५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पीककर्ज आढावा समितीत हा निर्णय झाल्याची माहीती सूत्रांनी दिली. याविषयीचा शासन अध्यादेश लवकरच जाहीर होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आगामी खरीप व रबी हंगामात विविध पिकांची कर्जमर्यादा ठरविण्यासाठी राज्यस्तर पीककर्ज आढावा समितीची बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये येत्या हंगामात शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणी, विविध पिकांचा वाढलेला उत्पादन खर्च व हेक्टरी सरासरी उत्पादन आणि बाजारभावावर आधारित विविध पिकांची कर्जमर्यादा ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात पुढील वर्षासाठी पीककर्जाचे दर ठरविण्यासाठी राज्यस्तर पीककर्ज आढावा समितीची बैठक होते. एप्रिलपासून कर्ज वाटपाला सुरूवात अमरावती : त्यानंतर सर्व जिल्हा बँकांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत जिल्हा पीककर्ज आढावा समितीची बैठक घेण्यात येते. यामध्ये पीक पद्धतीनुसार संबंधित बँकांना राज्यस्तर समितीने ठरवून दिलेल्या पीककर्ज मर्यादेच्या १५ टक्क्यापर्यंत पीककर्जात वाढ करण्याचे अधिकार आहेत. मात्र, राज्यस्तर समितीने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कर्जाचे दर जिल्हा समित्यांना कमी करता येणार नाहीत, प्रतिहेक्टरी खर्च व उत्पादन, सध्याचे बाजारभाव, सरासरी पीकक्षेत्र अशा सर्व बाबी गृहित धरून पीककर्ज दर ठरविण्यात येतो. यामध्ये खरीप, रबी, उन्हाळी पिके, भाजी, फळे व फुले यासर्व पिकांचा विचार केला जातो व कर्जवाटपाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात करण्यात येते. (प्रतिनिधी)