शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

१,४२० कोटींचे कर्जवाटप बाकी

By admin | Updated: May 20, 2017 00:48 IST

यंदाचा खरीप हंगाम तीन आठवड्यांवर आला असतानाही पीक कर्जाविषयी अद्याप कोणताही तोडगा शासन स्तरावर निघाला नाही.

खरीप हंगाम : केवळ ११ टक्केच पीककर्ज वाटप लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यंदाचा खरीप हंगाम तीन आठवड्यांवर आला असतानाही पीक कर्जाविषयी अद्याप कोणताही तोडगा शासन स्तरावर निघाला नाही. बँकानी देखील पीक कर्ज वाटपास ठेंगा दाखविल्याने ११ टक्क्यांवरच कर्ज वाटप झाले आहे. अद्याप जिल्ह्यातील बँकाचे १,४९१ कोटी ४५ लाखांचे पीक कर्ज वाटप रखडले आहे. तुरीचे चुकारे नाहीत व बँकाचे कर्जवाटप नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,५९२ कोटी ५४ लाख रुपयांचे लक्ष्यांक आहे. यामध्ये जिल्हा बँकेला ५१६.६० कोटी, राष्टीयीकृत बँकाना १,०६२.०६ कोटी, व ग्रामीण बँकाना १३.८८ कोटी असे लक्ष्यांक आहे. मात्र या बँकानी आतापर्यंत केवळ १७ हजार ७१९ शेतकऱ्यांना १७३.०९ कोटींचे कर्जवाटप केले आहे. वाटपाचा ही केवळ ११ टक्केवारी आहे. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत खरीप कर्ज वाटपाची डेडलाईन दिलेली आहे. मात्र जिल्ह्यातील दोन लाखांवर शेतकरी थकबाकीदार असल्याने त्यांना नव्याने कर्ज देण्यास बँकांची तयारी नाही. यामध्ये तोडगा निघावा, यासाठी शासनाने ११ सदस्यीय समितीचे गठन केले आहे. ही समिती मे अखेरीस शासनाला अहवाल सादर करणार आहे व त्यानंतर थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी तोडगा काढण्यात येणार आहे.मात्र तोवर शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास बँका टाळाटाळ करीत आहे. राष्टीयीकृत बँकांचे दोन टक्केच वाटप सद्यस्थितीत जिल्हा बँकेने १५ हजार ६४८ शेतकऱ्यांना १४६.७८ कोटींचे कर्जवाटप केले आहे. ही २८ टक्केवारी आहे. राष्टीयीकृत बँकांनी एक हजार ९२३ शेतकऱ्यांना २४.९० कोटी म्हणजेच केवळ दोन टक्केच कर्जवाटप केले आहे. ग्रामीण बँकेने १५८ शेतकऱ्यांना १.४१ कोटींचे कर्जवाटप केले,ही १० टक्केवारी आहे. या सर्व बँकानी १७ हजार ३०९ शेतकऱ्यांना १७३.०९ कोटींचे कर्जवाटप केले आहे. ही फक्त ११ टक्केवारी आहे. कर्जमाफी चर्चेचे "साईड इफेक्ट" गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा जिल्ह्यासह राज्यात पेटला आहे. सर्वच राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांनीदेखील कर्जमाफीसाठी आवाज बुलंद केला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात कर्जमाफीचा निर्णय झाला. या सर्व चर्चेमुळे अनेक नियमित शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे शेतकरी थकबाकीदार झालेत. कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.