धामणगाव रेल्वे : तालुक्यात मागील १४ वर्षांत तब्बल ११७ शेतकऱ्यांनी कर्ज व सावकारीला कंटाळून आत्महत्या केली आहे़ केवळ ३१ कुटुंबांना शासनाने मदत दिली आहे़ यंदा दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.तालुक्यात कधी नव्हे, एवढा दुष्काळ पडला असला तरी सर्वाधिक शेतकऱ्यांची अत्महत्या सन २००६ मध्ये व सन २०१० मध्ये झाल्या आहेत. या दोन वर्षांत ३७ शेतकऱ्यांनी विष प्राशन केले़, तर सावकारांच्या कर्जामुळे सन २०१२ मध्ये १८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे़दिघी महल्ले, भातकुली, कावली, पिंपळखुटा, दिपोरी, चिंचपूर, अंजनसिंगी, सोनेगाव खर्डा, झाडा, मंगरूळ दस्तगीर, वडगाव राजदी, वाढोणा, काशीखेड, निंबोली, तिवरा, नागापूर, रायपूर, निंबोरा बोडका, वरूड बगाजी, आजनगाव, मंगरूळ दस्तगीर, वसाड, वकनाथ, तळणी, वाठोडा, परसोडी, गोकुळसरा, ऐरली, शेंदूरजना खुर्द, भिल्ली, नारगावंडी, आसेगाव, झाडगाव, विरूळ रोंघे, देवगाव, जूना धामणगाव, जळगाव आर्वी, आष्टा, दाभाडा, शिदोडी, अंजनवती, हिंगणगाव, विटाळा, हिरापूर, जळकापटाचे, बोरगाव धांदे, तळेगाव दशासर, उसळगव्हाण, मलातपूर, कामनापूर घुसळी, अशोकनगर, वाघोली येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे़ (तालुका प्रतिनिधी)
१४ वर्षांत ११७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा
By admin | Updated: December 22, 2014 22:40 IST