शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर १४ लाखांची अवैध देशी दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 00:37 IST

अवैधरीत्या ५९५ देशी दारुचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक लोणी पोलिसांनी महामार्गावर पकडला.

५९५ बॉक्स जप्त : लोणी पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क बडनेरा : अवैधरीत्या ५९५ देशी दारुचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक लोणी पोलिसांनी महामार्गावर पकडला. यात १४ लाख रुपयांची दारू मोर्शी येथे जात होती. ही कारवाई बुधवार १७ मे रोजी उशिरा रात्री केली. नाकाबंदीत हा ट्रक पकडण्यात आला. दिगांबर शिवदास बर्वेकर (६२, रा. चिखली, जि.बुलडाणा), कृष्णा छगन बहिरागी (३०, निमाड, म.प्र.), इरफान वल्द जाकीर (२९, बालसमर, म.प्र.), गालगोर चंद्रगोर (५७, रा. रामनगर, जालना) अशी आरोपींची नावे आहेत. बुधवार १७ रोजी सायंकाळी ७ वाजता महामार्गावरील वाटपूर फाट्यानजिक नाकाबंदीत लोणी पोलिसांनी एमएच १८ एम ५७६२ क्रमांकाच्या ट्रकला थांबविले व त्याची तपासणी करण्यात आली. पोलिसांना त्यात देशी दारूचे बॉक्स आढळून आले. ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला. उशीरा रात्रीपर्यंत कारवाई सुरू होती. त्यात ५९५ देशी दारुचे बॉक्स आढळून आलेत एकूण १३ लाख ८७ हजारांची दारू जप्त करण्यात आली. लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक ए.एन.चेतरकर, गजानन डवरे, शालीग्राम गवई, प्रकाश किल्लेदार, श्रीकांत बेले, राजेंद्र ताथोडे, नागरभोजे आदी पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी होते. पकडलेला देशी दारूचा माल अकोल्याहून मोर्शी येथे जात असल्याचे पोलिसांना समजते. ट्रकसह चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर कलम ६५ (ई) मुंबई प्रो.अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. अवैधरीत्या देशी दारू वाहून नेणाऱ्या ट्रकला पकडून लोणी पोलिसांची ग्रामीण भागातील ही मोठी कारवाई आहे. अमरावती शहराकडे वाहनांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू येत असल्याचे झालेल्या कारवाईवरून समोर येत आहे. नाकाबंदी चोख ठेवल्यास बऱ्यापैकी अवैध दारू पोलिसांना पकडता येऊ शकते.