शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१४ पर्यंत शैक्षणिक प्रदर्शनी

By admin | Updated: June 13, 2015 00:27 IST

कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धेय बाबूजी ऊर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.

अमरावती : कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धेय बाबूजी ऊर्फ जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली. यावेळी इयत्ता दहावी व बारावीत गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात खुशबू हेडा, अदिती शिरभाते, श्रेया मांडवगडे, प्रतापसिंह महाडीक या विद्यार्थ्यांना भेटवस्तू, गुलाब पुष्पाचे रोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान ‘न्युरो ल्ािंग्युस्टिक प्रोग्रामिंग’च्या क्षेत्रात निष्णात असलेले सुशील मेहरोत्रा यांनी करियर संबंधित मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना आवडीनिवडीचे क्षेत्र निवडण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियाविषयी नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे संचालन दीपाली भटनागर, अंबरीन तब्बसूम यांनी केले.पालकांनी स्वप्न लादू नये - जिल्हाधिकारीप्रत्येकाच्या यशात गुरु असतोच. आज स्पर्धेचे युग असून पालकांपेक्षा पाल्य सतर्क आहेत. त्यामुळे पाल्यांना कोणत्या क्षेत्रात करियर करायचे हे स्वातंत्र्य दिले पाहिजे. बदलत्या काळानुसार निर्णय घेतला पाहिजे. समाधान व आवड असलेल्या क्षेत्रात करियर केल्यास यश मिळते. पदवी कोणतीही असो नक्कीच करियर करता येते. परंतु समाजाचे ऋण फेडायचे असेल तर पब्लिक सर्व्हिसेस क्षेत्रात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. पाल्यांना मित्र म्हणून वागणूक द्या. स्वत:च्या करियरचे अनुभव सांगताना मी इंजिनियर असताना आयएएस झाल्याचे त्यांनी सांगितले.करियर निवडताना चुका होऊ नये- आयुक्तपाल्यांची जबाबदारी आई - वडिलांवर आहे. मात्र, त्यांच्या करियर निवडीचे अधिकार त्यांनाच असावे. अन्यथा इच्छा नसताना वेगळाच जॉब करावा लागतो. त्यामुळे त्या क्षेत्रात करियर करताना पाल्यांना अवघड होते. क्षेत्र निवडीपूर्वी पाल्यांचे अ‍ॅप्टिट्युट व ब्रेन मॅपिंग केल्यास बऱ्याच बाबी सुकर होतात. त्यामुळे पाल्यांवर कोणतीही मर्जी न लादता पालकांनी त्यांना करियर निवडीचे स्वातंत्र्य द्यावे. अन्यथा करियर निवडताना चुका झाल्यास त्या आयुष्यात सल म्हणून बोचत राहतात, असे आयुक्त चंद्रकांत गुडेवार म्हणाले.