शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’साठी १२२ कोटी मंजूर

By admin | Updated: May 4, 2016 00:24 IST

केंद्र सरकारच्या अटल मिशन रेजीव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन (अमृत) योजनेत अमरावती महापालिका आणि अचलपूर नगरपरिषदेचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हास्तरीय समितीचे गठन : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा प्रस्तावअमरावती : केंद्र सरकारच्या अटल मिशन रेजीव्हेशन अ‍ॅन्ड अर्बन (अमृत) योजनेत अमरावती महापालिका आणि अचलपूर नगरपरिषदेचा समावेश करण्यात आला आहे. नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले असून अमरावतीत पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी १२२ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने अमरावतीसह अचलपूर शहराचा ‘अमृत’ योजनेत समावेश केला. राज्यानेदेखील ही योजना यशस्वीपणे राबविली जावी, याकरिता बैठकांचे सत्र चालविले आहे. अमरावती शहरात पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, यासाठी १२२ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला. जीवन प्राधिकरणाने पाणी पुरवठा योजनेशी निगडित बाबींचा समावेश करून सदर प्रस्ताव राज्य शासनाक डे १६ एप्रिल रोजी सादर केला आहे. मजीप्राचा २५ टक्के स्वहिस्साअमरावती : ‘अमृत’ योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षस्थानी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे सहअध्यक्ष खा. आनंदराव अडसूळ तर सदस्य म्हणून महापौर, आयुक्त, आमदार, पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता, नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. १२२ कोटींच्या प्रस्तावाद्वारे अमरावतीत पाणी पुरवठ्याशी निगडीत समस्या मार्गी लावल्या जाणार आहे. ‘अमृत’ योजनेत जीवन प्राधिकरणाला २५ टक्के स्वहिस्सा अदा करावा लागणार आहे. ही रक्कम ३० कोटींच्या घरात राहणार आहे. योजनेतून पाणी पुरवठ्याशी निगडि तकामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.‘अमृत’मधून ही कामे होतील पूर्णसिंभोरा येथे सहा पंप बदलविणेतपोवन येथे ६१ दशलक्ष मीटरचे शुद्धीकरण केंद्र निर्मितीशहरात नवे १३ जलकुंभ निर्माण करणेजुन्या २६३ कि. मी. लांबीच्या जलवाहिनी बदलविणेशहरात नवीन २६५ कि.मी. जलवाहिन्या टाकणेतपोवन येथील पंप बदलविण्यासह किरकोळ कामेतपोवन येथे ११.५० लाख रुपयांचे सोलर पंप बसविणेजिल्ह्यात ‘अमृत’ योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार जिल्हास्तरीय समितीचे गठन करण्यात आले आहे. या समितीच्या दोन बैठका घेण्यात आल्या आहेत.- किरण गीत्ते,जिल्हाधिकारी, अमरावतीकेंद्र सरकारने ९६.५० कोटींच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मात्र कामे वाढल्यामुळे हा प्रस्ताव १२२ कोटींवर पोहोचला. राज्य शासनाने मंजुरी दिली असून निविदा प्रक्रिया राबविली जाईल.- प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता (मजिप्रा)