शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी ११० कोटींची योजना

By admin | Updated: August 17, 2015 00:04 IST

महानगरात पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेली ४९ कोटींची योजना आता शाश्वत पाणीपुरवठा अंतर्गत ११० कोटींची होणार आहे.

सर्वेक्षण : समस्या निकाली काढणारलोकमत विशेषगणेश वासनिक अमरावतीमहानगरात पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित असलेली ४९ कोटींची योजना आता शाश्वत पाणीपुरवठा अंतर्गत ११० कोटींची होणार आहे. त्याकरिता नवीन भागाचे सर्वेक्षणअंती पुढील २५ वर्षांचे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात पिछाडीवर असलेल्या शहरांची अमृत योजनेत निवड करण्यात आली आहे. यात अमरावती शहराचा समावेश असून नागरिकांना शाश्वत पाणीपुरवठा केला जाणार आहे. केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था असे संयुक्तपणे अमृत योजनेत निधी मिळणार आहे. केंद्राचा ५० टक्के तर राज्य शासन आणि महापालिकांना २५ टक्के रक्कम द्यावी लागणार आहे. लवकरच सर्वेक्षण होणारअमरावती : स्मार्ट सिटीनंतर केंद्र सरकारची दुसरी शाश्वत पाणीपुरवठ्याची योजना आहे. या योजनेत पाणीपुरवठ्याची गळती रोखणे, वितरण व्यवस्था सुधारणे, पाणीपट्टीची वसुली यंत्रणा सुधारणे याचा समावेश आहे. एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांचा या योजनेत समावेश केला आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील शहरांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आवश्यक सोईसुविधांच्या दृष्टीने नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले जाईल. स्मार्ट सिटी अभियानात शहराला आवश्यक असलेल्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. सर्वांच्या घरी नळ जोडणी हे अभियान राबविले जाईल. स्टँडपोस्टमुक्त शहराची संकल्पना पूर्णत्वास आणताना २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणीपुरवठ्याच्या अद्ययावत सोईसुविधा पुरविण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. महापालिका हद्दीत असलेल्या लोकवस्तींचा आराखडा घेत जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. नव्याने जलकुंभाची निर्मिती करताना नवीन पंप स्टेशन, पाणी शुद्धिकरण केंद्राची निर्मिती, १५६ दशलक्ष लिटरची व्यवस्था सुधारण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. सुमारे ११० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना शासनाकडे पाठविली जाणार आहे. (प्रतिनिधी)