शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

११ शेतकऱ्यांनी परत केला अतिवृष्टीचा मदतनिधी

By admin | Updated: January 28, 2015 23:07 IST

अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक

अमरावती : अडीच वर्षांपूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे खरीप पीक नष्ट झाले होते. त्याची नुकसान भरपाई म्हणून ५०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जानेवारी २०१५ मध्ये जमा करण्यात आले. त्यामुळे दुष्काळातही शासनाला थट्टा सुचते, असा आरोप करीत ११ शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ५ हजार ९०० रूपयांचा डी. डी. (धनादेश) शासनाला परत केला आहे.४ ते ५ सप्टेंबर २०१२ रोजी अतिवृष्टी होऊन भातकुली तालुक्याताील पूर्णानगर येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले.अतिवृष्टीमुळे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी संयुक्त पाहणी व पंचनामे केलेत. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. अहवालही अधिकाऱ्यांना दिला. मदतनिधीची रक्कम पाहिल्यावर शेतकऱ्यांना धक्का बसला. शेतकऱ्यांना एकाच मापात तोलण्यात आलेले आहे. अतिवृष्टीच्या शासन मदतीच्या निकषापेक्षाही कितीतरी पटीने कमी केले आहे.मदतीचा निकष कोणता, संतप्त शेतकऱ्यांचा सवालनैसर्गिक आपत्तीमध्ये हेक्टरी ४५०० रूपयांची मदत मिळते. अतिवृष्टीदेखील नैसर्गिक आपत्तीच असल्याने प्रचलित निकषानुसार शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे. प्रत्यक्षात ३ ते ८ एकर शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५०० ते ६०० रूपयांची शासन मदत देण्यात आल्याने मदतीचा निकष कोणता, असा संतप्त शेतकऱ्यांचा सवाल आहे.