स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान : सर्वाधिक सैनिक निंबोलीचे, धामणगाव तालुक्याचा स्वातंत्र्य लढ्यात सहभागधामणगाव रेल्वे : शविवारी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा ६८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याचे हे फळ चाखताना यासाठी बऱ्याच लोकांनी मोजलेली किंमत विस्मरणात जाऊ नये, असे वाटते. लाखोंनी दिलेल्या बलिदानाच्या पायाभरणीवर स्वातंत्र्याची इमारत उभी आहे. अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली़ विद्यानगरी म्हणून लौकिकप्राप्त धामणगावनगरीदेखील यात मागे नव्हती. आजही या नगरीतील १०५ सुपुत्र भारतमातेचे रक्षण करीत आहेत.सुगनचंद लुनावत, अंबादास भेंडे, बाबासाहेब अंदुरकर, अमरसिंह ठाकूर, गुलाबराव झाडे यांच्यासह अनेक माजी सैनिक या नगरीत होऊन गेलेत. सुगनचंद लुनावत हे महात्मा गांधी यांच्यासोबत अहिंसेच्या मार्गाने लढा उभारत असताना सन १९४१ मध्ये त्यांना अटक करुन नागपूर येथील तुरुंगात सहा महिने ठेवण्यात आले. त्यावेळी त्यांना तेथे अंबाडीचे बेत तयार करण्याचे काम देण्यात आले होते. लुनावत हे महात्मा गांधी यांच्या म्हणण्याप्रमाणे आमदारकीचा राजीनामा देऊन स्वतंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासोबतीने स्वातंत्र्याकरिता लढा दिला होता़ आजही तालुक्याचे या राष्ट्रीय कामात मोठे योगदान आहे़ आजपर्यंत झालेल्या विविध युध्दात तसेच सीमेपलीकडून झालेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. जन्म देणाऱ्या आईपेक्षा भारतमातेला अधिक सन्मान देणारे १०५ सैनिक तालुक्यात आहेत़ उत्तरपूर्व, सागरी सीमा असलेल्या त्रिकोणी भागात व भारतीय संरक्षण खात्यातील तीनही विभागांत धामणगावातील सैनिक कार्यरत आहेत. सावळा व निंबोली ही गावे आजही सैनिकांची गावे म्हणून ओळखली जातात. सावळा येथील चिकटे कुटुंबातील दोन सदस्य सैन्य दलात तैनात आहेत. निंबोली येथील विशाल प्रशांत वैरागडे यांच्यासह याच गावांतील सहा सैनिक देशसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. धामणगाव शहरातील तब्बल अकरा तर मंगरूळ दस्तगीर येथील आठ सैनिकांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले आहे़ शेंदुरजना खुर्द, काशीखेड, आसेगाव, निंभोरा बोडका, वरूड बगाजी, ढाकुलगाव, रायपूर कासरखेड, वकनाथ, नारगावंडी, बोरगाव निस्ताने, पिंपळखुटा, झाडगाव, वाढोणा येथील अनेक जवान सैन्यदलात सामील होऊन भारतमातेची सेवा करीत आहेत.१४ विरपूत्र झाले शहीद आजपर्यंत सीमेपलिकडून झालेला हल्ला, भारत-पाकिस्तानमध्ये झालेले युध्द, कारगीलचे युध्द यात जिल्ह्यातील १४ तर धामणगाव तालुक्यातील आजनगाव व पिंपळखुटा येथील दोन जवान यापूर्वी शहीद झाले आहेत. आजही अशा शहीद जवानांच्या वीर नारी, वीर माता, वीर पित्यांचा सन्मान १६ आॅगस्ट रोजी अमरावती जिल्हा सैनिक कार्यालयाच्यावतीने करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक विभागाचे अधिकारी रत्नाकर चरडे व जनमाहिती अधिकारी दिनेश गोवारे यांनी दिली़
१०५ सुपूत्र करतात भारतमातेचे रक्षण
By admin | Updated: August 15, 2015 00:41 IST