शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट कोविड ‘म्युकरमायकोसिस’चे 101 रुग्ण, मृतांच्या संख्येत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 05:00 IST

शहरातील फिजिशियन तसेच नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांनी उपचार घेतला, याची माहिती मागण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खासगी डॉक्टरांकडून माहिती घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाद्वारे साप्ताहिक अहवाल केला जात आहे.

ठळक मुद्देगंभीरता वाढली, उपचारानंतर ६६ बरे, अद्यापही ३५ वर उपचार सुरू

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गातून बरे झालेल्या काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ या  आजाराचा सामना करावा लागत आहे. यात दोन ते तीन महिन्यांत शहरात १०१ रुग्णांची नोंद झाली असताना मृत रुग्णांच्या संख्येविषयी संभ्रम आहे. ‘म्युकरमायकोसिस’ वा काळ्या बुरशीच्या आजाराच्या यापूर्वी नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे क्वचितच या रुग्णांची नोंद व्हायची. मात्र, कोरोना संसर्गात सहव्याधीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये या आजाराचे रुग्ण अधिक आहे. इर्विन रुग्णालयात  म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी एक वाॅर्ड तयार करण्यात आला. या वाॅर्डात २० बेड असून, १० रुग्णांवर उपचार सुरू आहे.  जिल्ह्यात या आजाराचे नेमके किती रुग्ण आहेत. याविषयीची माहिती आरोग्य यंत्रणा ठामपणे सांगू शकत नाही. नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांनी मात्र किमान ५०० वर रुग्ण उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ला दिली. 

खासगी डॉक्टरांना मागितला अहवालशहरातील फिजिशियन तसेच नाक-कान-घसा व नेत्र तज्ज्ञांकडे आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांनी उपचार घेतला, याची माहिती मागण्यात आल्याचे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खासगी डॉक्टरांकडून माहिती घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाद्वारे साप्ताहिक अहवाल केला जात आहे.

ॲम्फोटेरोसीन-बी इंजेक्शनचा तुटवडाया आजारावर प्रभावी ‘ॲम्फोटेरोसीन-बी’ इंजेक्शनचा तुटवडा आहे.  यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

मृतांची संख्या पहिले ३१, नंतर निरंकजिल्हा शल्यचिकित्सकांद्वारे म्युकरमायकोसिसच्या मृत रुग्णाबाबत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालात जिल्ह्यात ३१ मृत दाखविण्यात आले. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी एक रुग्ण दगावल्याचे सांगितले. आरोग्य उपसंचालक राजकुमार चव्हाण यांनी सीएस कार्यालयाकडून आलेल्या मृतांच्या संख्येत घोळ असल्याचे सांगितले. मृतांची संख्या निरंक असल्याचे सीएस निकम यांनी सांगितले.

प्रशासनाची लगबगदोन दिवसांपूर्वी नवाल यांनी या आजारासंदर्भात शहरातील खासगी डॉक्टरांची बैठक घेतली. याशिवाय शनिवारी डाॅक्टरांची कार्यशाळा झाली. 

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या