शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईसाठी १० कोटींचा आराखडा

By admin | Updated: January 19, 2016 00:12 IST

यावर्षीही पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता...

प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकारी देणार मंजुरीअमरावती : यावर्षीही पावसाने दडी मारल्यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्यात पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ सुमारी १० कोटी रूपयाचा कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मंगळवारी कृती आराखडयास जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने यावर्षी तयार केलेल्या संभाव्य पाणी टंचाईच्या कृती आराखडयात जिल्ह्यातील ७०८ गावात ७३६ पाणी टंचाईच्या उपाय योजना प्रस्तावित केल्या आहे. यासाठी जवळपास १० कोटी रूपयाचा खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत पाणी टंचाईच्या पहिल्या टप्यात जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नाही. दुसऱ्या टप्यात जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत जिल्ह्यातील ४०१ गावे व वाड्यांमध्ये मागणी नुसार पाणी टंचाईसाठी उपाय योजना प्रस्तावित करण्यात येणार आहेत. तर पाणी टंचाईच्या तिसऱ्या टप्यातील एप्रिल ते जून २०१६ या कालवधीत जिल्ह्यातील काही गावात तीव्र पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ३०७ गावात पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. संभाव्य कृती आराखडयात नवीन विंधन विहीर ३०७, नळ योजनांची विशेष दुरूस्ती १९१, तात्पुरत्या पूरक नळयोजना ५३, टँकर अथवा बैलजोडीने पाणी पुरवठा करणे १५ गावे, विहिरींचे अधिग्रहण करणे १७० यासोबतच वेळेवर उद्भवणाऱ्या परिस्थिती नुसार विहिंरीचे खोलीकरण, गाळ काढणे, विंधन विहिरींची दुरूस्ती आदी उपाययोजना करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाईची कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार पाणी टंचाईचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी गित्ते यांची मंजुरात मिळताच त्यानुसार अंलबजावणी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)