शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांची १० कोटींनी फसवणूक

By admin | Updated: March 19, 2016 00:12 IST

बनावट दस्तऐवजांद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक करणारे शहरात सक्रिय असून काही वर्षांत १० कोटीने राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

बनावट दस्तऐवजांद्वारे कर्ज : आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासअमरावती : बनावट दस्तऐवजांद्वारे राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक करणारे शहरात सक्रिय असून काही वर्षांत १० कोटीने राष्ट्रीयीकृत बँकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून पोलीस पसार आरोपीच्या शोधात आहे. काही वर्षांत बँकेत फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस आल्या. त्यामध्ये २०१२ मध्ये सैयद शारीख व सैय्यद तारीक या दोन आरोपींनी सेंट्रल बँक आॅफ इंडियाची कोट्यवधीने फसवणूक केली होती. अल्युमिनीअम कारखाना काढण्याच्या नावाने दोघांनीही कंपनी उघडून बॅकेकडून कोट्यवधीचे कर्ज काढले होते. त्याकरिता बनावट दस्तऐवज सादर केले होते. या दोन्ही आरोपींना पुणे येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतरही काही घटना शहरात उघडकीस आल्या आहे. मार्च महिन्यात बुधवारा परिसरातील रहिवासी गजाजन कुळकर्णी, मंगेश उताणे, प्रदीप कळसकर व त्यांच्या पत्नीने एकाच संपत्तीचे दस्तऐवज विविध बँकांत गहाण ठेवून कोट्यवधींचे कर्ज घेतल्याचे उघड झाले. यामध्ये कळसकर याने बडोदा बँकेत संपत्तीचे दस्तऐवज सादर करून १ कोटी ४० लाखांचे कर्ज काढले होते. ते दस्तऐवज हरविल्याची तक्रार राजापेठ ठाण्यात केली. त्यानंतर बनावट दस्तऐवजावरून इलाहाबाद बँकेतून ७० लाखांचे कर्ज उचलले. आरोपी कुळकर्णी याने गोमती फु्रट नावाने कंपनी उघडून ७ कोटी ५० लाखांचे अर्ज काढले. यामध्ये त्याने गणेश महादेव इंगळे याला भागीदार केले होते. त्याचप्रमाणे त्यांचे मित्र नितीन बुरंगे यालाही सहभागी केले होते. हे कर्ज काढताना आरोपींनी साक्षीदार म्हणून मिलिंद लोहकरे, उल्हास जोशी व चेतन जोशी यांनाही सहभागी केल्याचे पोलीस चौकशीत लक्षात आले आहे. गजानन कुळकणी याने नागपूर येथील बँकांनाही गंडा घातला आहे. हे सर्व फसवणुकीचे प्रकरणे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये घडले असून दस्तऐवजाची शहानिशा न केल्यामुळे बँकांना कोट्यवधीचा गंडा आरोपींने घातला आहे. सर्वसाधारण व्यक्तींना बॅकांतून कर्ज काढताना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांना कर्ज देण्यासाठी विविध दस्ताऐवजाची मागणी केली जाते. पूर्तता न झाल्यास कर्जसुध्दा दिले जात नाहीत. मात्र, फसवणुक करणाऱ्यांनी बँकाना कोट्यवधीचा गंडा घातला तरीसुध्दा बॅकांच्या लक्षात आले नाही.