शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

झोननिहाय डम्पिंग ग्राउंडचे नियोजन कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:17 IST

कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता, साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यंतरी मनपा प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चे नियोजन केले होते. कचर्‍याच्या समस्येमुळे अक ोलेकर त्रस्त झाले असताना सत्ताधारी व प्रशासनाचे नियोजन अद्यापही कागदावर असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देकचर्‍याच्या समस्येमुळे अकोलेकर त्रस्तसत्ताधारी-प्रशासनाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कचरा साठवणुकीसाठी नायगावस्थित ‘डम्पिंग ग्राउंड’ची जागा अपुरी पडत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. शहराचा विस्तार व कचर्‍याची समस्या लक्षात घेता, साचलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मध्यंतरी मनपा प्रशासनाने झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’चे नियोजन केले होते. कचर्‍याच्या समस्येमुळे अक ोलेकर त्रस्त झाले असताना सत्ताधारी व प्रशासनाचे नियोजन अद्यापही कागदावर असल्याचे चित्र आहे. नायगाव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या सुमारे १२ एकर जागेवर ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्यात आले. या ठिकाणी साठवणूक होणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे कचर्‍याचे ढीग साचले आहेत. परिसरात प्रचंड दुर्गंंधी पसरली असून, स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. कचर्‍यामुळे परिसरातील पाण्याचे जलस्रोतदेखील दूषित झाले आहेत. शिवाय, स्थानिक अतिक्रमकांनी मनपाच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा लावल्यामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. शहरातील कचरा घेऊन जाणार्‍या मनपाच्या घंटागाडी चालकांना शिवीगाळ करणे, धमकाविण्यासह मारहाण करण्यापर्यंत अतिक्रमकांनी मजल गाठली आहे. एकूणच ही समस्या ध्यानात घेता नायगावातील ‘डम्पिंग ग्राउंड’वरील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याची नितांत गरज आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प उभारणे आवश्यक असताना महापालिका झोननिहाय ‘डम्पिंग ग्राउंड’ निर्माण करण्याच्या तयारीत असून, त्यानुषंगाने जागेचा शोध घेतला जात आहे. डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवणूक करण्यास स्थानिकांचा विरोध होत असल्यामुळे घंटागाडी चालक शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकून मोकळे होत आहेत. परिणामी, शहरात साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. एकूणच, कचर्‍याची बिकट समस्या ध्यानात घेता प्रशासनासह सत्ताधारी भाजपाने तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. 

जागेसाठी शोधाशोध पण..घनकचर्‍याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपा आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असले, तरी ठोस उपाय निघत नसल्याची परिस्थिती आहे. मध्यंतरी आयुक्त लहाने यांनी मनपात सामील झालेल्या नवीन प्रभागांमधील शासकीय जमिनींची पाहणी केली होती. त्यामध्ये शिलोडा, गुडधी, शिवणी, शिवर परिसरातील ‘ई-क्लास’ जमिनीचा समावेश होता. २0 ते २५ एकर जमिनीवर एकाच ठिकाणी कचरा साठवणूक करून त्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

मनपाचा प्रयोग धोक्याची घंटा?मनपाने झोननिहाय डम्पिंग ग्राउंड निर्माण करून कचरा साठविल्यास शहराच्या चारही बाजूंनी दुर्गंंधीची समस्या निर्माण होऊन जलस्रोत दूषित होतील, यात दुमत नाही. त्यामुळे मनपाचा हा प्रयोग अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार तयार केलेल्या मैदानावर कचरा साठवल्यास प्रदूषणाची तीव्रता काहीअंशी कमी होईल, असे मैदान तयार करण्याची प्रशासनाची तयारी आहे का, यासंदर्भात सत्ताधारीच नव्हे, तर सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारण्याची गरज आहे.